हॉटेलमध्ये 'ती' तुझी वाट बघतेय! पोहोचलास की फोटो पाठव! मुंबईत ३५० जणांना मेसेज गेला अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 28, 2022

हॉटेलमध्ये 'ती' तुझी वाट बघतेय! पोहोचलास की फोटो पाठव! मुंबईत ३५० जणांना मेसेज गेला अन्...

https://ift.tt/wVDZEld
मुंबई: आणि आसपासच्या परिसरातील जवळपास ३५० जणांची एका टोळीनं केली आहे. यातील केवळ एकानं आतापर्यंत तक्रार दाखल केली आहे. म्हणून काम देण्याच्या नावाखाली टोळीनं जवळपास ३५० जणांना गळाला लावलं. या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मेल एस्कॉर्ट्सच्या नावाखाली गंडा घालण्यासाठी टोळीनं अतिशय साधीसोपी पद्धत वापरली. यातून फसवणूक झालेले पुरुष तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येणार नाहीत. कारण तक्रार केल्यास त्यांचीच बदनामी होईल असा टोळीतील सदस्यांचा होरा होता. मात्र एकानं तक्रार दाखल केली आणि टोळीचा कारनामा उजेडात आला. या टोळीनं मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेकांना गळाला लावलं. फसवणुकीची पद्धत काय? फ्रेंडशिप ग्रुप्सचे सदस्य व्हा आणि पैसे कमवा, अशी ऑफर टोळीकडून पुरुषांना दिली जायची. ग्राहक महिला असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचायचं. तिथे पोहोचल्यावर ग्राहकाला खूष करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करून गिफ्ट खरेदी करायचं. यानंतर एस्कॉर्ट म्हणून आलेला पुरुष हॉटेलमध्ये जायचा, रुमपर्यंत पोहोचायचा. मात्र रुम एकतर रिकामी असायची किंवा मग तिथे भलतंच कोणीतरी असायचं. टोळीचा पर्दाफाश कसा झाला? फसवणूक झालेल्यांपैकी एकानं पोलीस तक्रार करण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे टोळीचा पर्दाफाश झाला. काही जणांनी मला व्हॉट्स ऍपवर संपर्क साधला. गीता फ्रेंडशिप ग्रुप, ऋषी फ्रेंडशिप ग्रुप आणि नीता स्पा फ्रेंडशिप ग्रुप अशा तीन ग्रुप्सचं सदस्यत्व घेण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला गेला. नोंदणी शुल्क म्हणून १५०० आणि दोन महिन्यांच्या सर्व्हिसचे १५०० रुपये मला भरण्यास सांगण्यात आल्याचं फसवणूक झालेल्या व्यक्तीनं सांगितलं. गेल्या आठवठ्यात तक्रारदाराला एका थ्री स्टार हॉटेलमध्ये जाण्यास सांगितलं गेलं. तिथे त्याला गिफ्ट (बॉडी मसाज किट) विकत घेण्यास सांगण्यात आलं. त्याची किंमत ६५०० रुपये होती. यासाठीचं पेमेंट ऑनलाईन करण्यास सांगितलं गेलं. हॉटेलच्या रुमवर क्लबकडून किट दिलं जाईल असं त्यास सांगण्यात आलं होतं. त्याची ओळख पटावी यासाठी हॉटेलवर गेल्यावर त्याचा 'लाईव्ह फोटो'देखील मागण्यात आला. हॉटेलमध्ये प्रवेश करताना तक्रारदाराकडे ११ हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून मागण्यात आले. हे पैसे परत केले जातील असं सांगण्यात आलं. क्लबचा सदस्य झाल्यावर विविध हॉटेलमध्ये महिलांना मसाज सर्व्हिस देण्यासाठी पाठवू. त्या एका वेळचे ३० ते ४० हजार रुपये देतील, असं टोळीकडून तक्रारदाराला सांगण्यात आलं. या रकमेतील २० टक्के क्लबला द्यावे लागतील, असंही सांगण्यात आलं. या सगळ्यात तक्रारदारानं जवळपास २० हजार रुपये गमावले. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू झाला. पैसे जमा झालेलं बँक खातं शोधलं. अभिषेक सिंह असं खातेधारकाचं नाव होतं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं त्याच्या सहकाऱ्यांची नावं सांगितली. सुजित सिंह, छोटू सिंह आणि किरण सिंह अशी त्यांची नावं आहेत. पैकी छोटूच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्याला अटक केली. तर इतरांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.