आता बस्स, अती झाले, ऋषभ पंतला आता विश्रांतीची गरज... विश्वचषक विजेत्या खेळाडूचे मोठे विधान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 29, 2022

आता बस्स, अती झाले, ऋषभ पंतला आता विश्रांतीची गरज... विश्वचषक विजेत्या खेळाडूचे मोठे विधान

https://ift.tt/oTtFWcC
नवी दिल्ली: निवड समितीचे माजी अध्यक्ष (Krishnamachari Shrikkanth) यांच्या मते () हा त्याला मिळालेली संधी वाया घालवत आहे. ऋषभच्या खेळात प्राण फुंकण्यासाठी आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती देण्याची गरज आहे, असे मत श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पंत सातत्याने अपयशी ठरला आहे. त्याने फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० प्रकारात शेवटचे अर्धशतक झळकावले होते. २०२२ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलेल्या २१ डावांमध्ये त्याने ३० धावांचा टप्पा केवळ दोनदा ओलांडला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये, या २५ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने यावर्षी नऊ डावांमध्ये दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. श्रीकांत त्याच्या चीकी चीका या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, 'तुम्ही त्याला (पंत) विश्रांती देऊ शकता आणि त्याला थोडे थांबण्यास सांगू शकता. नंतर तू पुनरागमन करू शकतो आणि भारतासाठी खेळू शकता. ऋषभ पंतला विश्रांती देण्यासाठी काही सामन्यांची वाट पाहत आहात की मग एक किंवा दोन सामन्यांनंतर त्याला वगळू इच्छित आहात का? क्लिक करा आणि वाचा- श्रीकांत पुढे म्हणाले, 'होय, ऋषभ पंतने मिळालेल्या सर्व संधींचा फायदा उठवला नाही. मी खूप निराश झालो आहे. हे काय होत आहे पंत... पंतने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत केवळ १७ धावा केल्या होत्या, तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो १५ धावांवर बाद झाला होता. भारताचा माजी सलामीवीर श्रीकांत पुढे म्हणाले, 'ऋषभ पंत संधी वाया घालवत आहे. अशा सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली तर मग ठीक आहे. विश्वचषक जवळ आला आहे. ऋषभ पंत धावा करू शकत नाही, त्यामुळे आगीत आणखीच तेल ओतण्यासाखेच होईल. क्लिक करा आणि वाचा- कृष्णमाचारी श्रीकांत पुढे म्हणाले, “ऋषभ पंत स्वतःवर दबाव आणत आहे. त्याला स्वतःला पुन्हा जागृत करण्याची गरज आहे. त्याला कसून खेळावे लागेल. तो नेहमीच आपली विकेट देतो." दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी खेळला जाणार आहे. क्लिक करा आणि वाचा-