
गोवा : गोव्यात सुरू असलेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) आज सोमवारी समारोप झाला. या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा झाली ती मुख्य ज्यूरी यांनी '' या चित्रपटावर व्यक्त केलेल्या मताबाबत. या समारंभात, महोत्सवाचे ज्यूरी प्रमुख नादव लॅपिड () यांनी 'द कश्मीर फाइल्स'ला IFFI सारख्या प्रतिष्ठित महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नादव लॅपिड यांनी या समारंभात आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, 'या महोत्सवातील सिनेमॅटिक समृद्धी, विविधतेबद्दल आणि गुणवत्तेबाबत मला महोत्सव प्रमुख आणि प्रोग्रॅमिंग दिग्दर्शकाचे आभार मानायचे आहेत. आम्ही नवोदित चित्रपटांच्या स्पर्धेत सात चित्रपट पाहिले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील १५ चित्रपट पाहिले. त्यांपैकी १४ सिनेमांमध्ये आम्हाला सिनेमॅटिक गुणात्मकता, त्यांतील गुण, दोष अशा मुद्द्यांवर ज्वलंत चर्चा घडवून आणल्या. क्लिक करा आणि वाचा- पुणे द कश्मीर फाईल या चित्रपटावर भाष्य करताना ते म्हणाले की, 'द कश्मीर फाइल्स' या १५व्या चित्रपटाने मात्र आम्हा सर्वांनाच त्रास झाला आणि धक्काही बसला. हा चित्रपट अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक स्पर्धात्मक विभागासाठी अयोग्य, अपप्रचार करणारा, आणि असभ्य चित्रपट वाटला. या मंचावर तुमच्याशी या भावना मोकळेपणाने शेअर करण्यात मला पूर्णपणे कंफर्टेबल वाटत आहे. या महोत्सवाचे धाटणी पाहता येथे कला आणि जीवनासाठी आवश्यक असलेली टीकात्मक चर्चा देखील निश्चितपणे स्वीकारार्ह आहे,” क्लिक करा आणि वाचा- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत नादव लॅपिड यांनी ही टिप्पणी केली. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित, द कश्मीर फाइल्स हा १९९० च्या दशकातील हिंदूना आपले ठिकाण सोडावे लागणे आणि काश्मिरी पंडितांच्या ठरवून केलेल्या हत्यांवर आधारित चित्रपट आहे. द कश्मीर फाइल्सला प्रदर्शित झाल्याबरोबर अनेक वादांना तोंड द्यावे लागले आहे. अनेक समीक्षकांनी "प्रचारकी चित्रपट" म्हणूनही त्याची निंदा केलेली आहे. अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २०२२ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. क्लिक करा आणि वाचा-