रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सहा हजार कोटी, दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 25, 2022

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सहा हजार कोटी, दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा दावा

https://ift.tt/bNVzuSs
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कंत्राटदारांच्या अल्प प्रतिसादामुळे महिनाभरापूर्वी रद्द करण्यात आलेल्या रस्तेकामाच्या निविदा पुन्हा मागवण्यात आल्या आहे. शहर व उपनगरातील सुमारे ४०० किमी रस्त्यासाठी मुंबई महापालिकेने गुरुवारी ६ हजार ७९ कोटी रुपयांच्या नव्याने निविदा काढल्या आहेत. या निविदा प्रक्रियेला महिन्याभराचा कालावधी लागणार असून, त्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी रस्ते काँक्रिटीकरण वाढवण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने २ ऑगस्ट, २०२२ रोजी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ५८०० कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेत घालण्यात आलेल्या अटी, शर्ती पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या काही बड्या कंत्राटदारांनी निविदेकडे पाठ फिरवली. त्यामुळे ही निविदा १ नोव्हेंबर, २०२२ रोजी रद्द करण्यात आली होती. आता मुंबई शहरासाठी एक, पूर्व उपनगरासाठी एक आणि पश्चिम उपनगरासाठी तीन निविदांचा समावेश आहे. 'नव्याने निविदा प्रक्रिया राबवताना बहुसंख्य जुन्या अटी आणि शर्ती कायम ठेवल्या आहेत. सध्याच्या बाजार भावाप्रमाणे दर देण्यात आले आहेत', अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. 'पोरस' काँक्रीट तंत्रज्ञान वापरण्याची अट नवीन निविदेत समाविष्ट केली आहे. पदपथावर या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यावरील पाणी ते शोषून घेते. त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेडवर क्यूआर कोड प्रसिद्ध करणे, काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे रस्त्यांची डागडुजी करणे आदी अटी कायम असल्याचे सांगण्यात आले आहे. १२ टक्क्यांनी खर्च वाढला पालिकेने याआधी मागवलेल्या निविदा सन २०१८च्या दरांनुसार मागवल्या होत्या. चार वर्षांच्या कालावधीत सिमेंट, लोखंड, स्टील आणि इतर आवश्यक सर्व कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे नव्या निविदा प्रक्रियेत कामाच्या कंत्राटाची रक्कम सुमारे १० ते १२ टक्क्यांनी वाढली आहे. रस्त्यांसाठी कोटीची उड्डाणे शहर किमी : ७२ खर्च : १२३३ कोटी ११ लाख ९९ हजार रु. पूर्व उपनगर किमी : ७० खर्च : ८४६ कोटी १७ लाख ६१ हजार रु. पश्चिम उपनगर किमी : २५३.६५ खर्च : भाग १ : १६३१ कोटी १९ लाख १८ हजार रु. भाग २ : ११४५ कोटी १८ लाख ९२ हजार रु. भाग ३ : १२३ कोटी ८४ लाख ८३ हजार रु. एकूण : ६०७९ कोटी ५२ लाख ५४ हजार रु.