
धुळे : साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथे मित्रांनी केलेली मस्करी एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. येथील सुजलॉन कंपनीत काम करणाऱ्या तरुणाच्या गुदद्वारात सहकारी मित्राने प्रेशर नळी लावून मस्करी करणे चांगलेच महागात पडले आहे. या घटनेत या झाला आहे. तुषार निकुंभ असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तुषारच्या मित्रांनी तुषारच्या गुदद्वारात कॉम्प्रेशर प्रेशर नळीच्या साह्याने हवा भरली. या घटनेचा तरुणाला त्रास होऊ लागल्याने त्यास तात्काळ नंदुरबार येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती आणखीनच बिघडल्यामुळे तेथून नातेवाईकांनी त्याला सुरत येथे उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान सुरत येथील रुग्णालयात या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणाच्या मित्रांनीच हा सर्व प्रकार मस्करीत केल्याने या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, या तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आक्रमक झाले असून कुटुंबीयांनी तरुणाचा मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका निजामपूर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या रस्त्यावर उभी करत रास्ता रोको सुरू केला आहे. तर तरुणाच्या या मारेकऱ्यांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केली होती. क्लिक करा आणि वाचा- अखेर ठोस आश्वासनानंतर सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले व रात्री या तरुणावर अंत्यसंस्कारचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, छडवेल कोर्डे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.