रोहित शर्मा टी-२० मालिकेत खेळणार की नाही, पाहा बीसीसीआयने आता तर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 27, 2022

रोहित शर्मा टी-२० मालिकेत खेळणार की नाही, पाहा बीसीसीआयने आता तर...

https://ift.tt/ry1dCHV
नवी दिल्ली : रोहित शर्माकडून कर्णधारपद जाणार, अशी जोरदार चर्चा सध्याच्या घडीला सुरु आहे. पण रोहित शर्मा आता श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत का खेळणार नाही, याचे कारण आता समोर आले आहे. रोहित शर्मा हा एक जगविख्यात फलंदाज आहे आणि एक कर्णधार म्हणून तो शांत असल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहितला बांगलादेशबरोबरच्या दुसऱ्या वनडेमध्ये दुखापत झाली होती. पण दुखापतीनंतर तो या सामन्यात खेळला होता. पण त्यानंतर रोहितला तिसरा वनडे सामना खेळता आला नव्हता. त्यानंतर दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये रोहितला खेळता आले नव्हते. कारण त्याची दुखापत ही गंभार स्वरुपाची असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर रोहित शर्मा नेट्समध्ये परतल्याचे पाहायला मिळाले खरे, पण तो १५ मिनिटांपेक्षा जास्त सराव करू शकला नव्हता. त्यामुळे रोहित अजूनही पूर्णपणे फिट आहे की नाही, याबाबत अजून कोणतेही अपडेट्स बीसीसीआयने दिलेले नाहीत. बीसीसीआय आता नव्या वर्षात भारताचा नवा कर्णधार नियुक्त करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. कारण रोहित शर्माला आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करता आली नव्हती. एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून तो अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता बीसीसीआय रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे रोहित अजूनही पूर्णपणे दुखापतीमधून सावरल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणाऱ्या मालिकेत तो खेळणार नसल्याचे संकेत मिळत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा हार्दिक पंड्याकडे देण्यात येईल. कारण या मालिकेसाठी रोहितबरोबर लोकेश राहुल, विराट कोहली, मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे आता रोहित थेट आयपीएलमध्येच टी-२० सामने खेळताना दिसू शकतो. पण हार्दिकच भारताचा कर्णधार का असेल, याचे उत्तरही समोर आले आहे. कारण स्टार स्पोर्ट्सने आता अशीच एक जाहीरात बनवली आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. स्टार स्पोर्ट्सने आता श्रीलंकेविरुद्धच्या जाहीरातीसाठी भारताकडून हार्दिक पंड्याला निवडले आहे. त्यामुळे आता हार्दिक भारताचा पुढील टी-२० कर्णधार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केलेली नाही किंवा त्याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे आता या गोष्टीची अधिकृत घोषणा मंगळवारी केली जाऊ शकते, असे समोर आले आहे.