गोवरच्या संसर्गानंतर चार दिवसांत बालकांना न्यूमोनियाची लागण, तज्ज्ञांनी व्यक्त केली वेगळीच भीती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 17, 2022

गोवरच्या संसर्गानंतर चार दिवसांत बालकांना न्यूमोनियाची लागण, तज्ज्ञांनी व्यक्त केली वेगळीच भीती

https://ift.tt/zC90JD7
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः गोवराचा संसर्ग झाल्यानंतर चार दिवसांमध्ये बालकांना न्यूमोनियाची लागण होत आहे. यापूर्वी हा कालावधी दोन आठवड्यांचा होता. त्यामुळे गोवराच्या विषाणूच्या वर्तनामध्ये बदल झाला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विलेपार्ले येथे युनिसेफ आणि केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेला हजेरी लावलेल्या तज्ज्ञांनी गोवराच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. सप्टेंबरपासून सापडत असलेल्या रुग्णांमध्ये गोवराची लागण झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये न्यूमोनियाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. विषाणूच्या रचनेत बदल झाला आहे का हे तपासण्याची गरज निर्माण झाली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. अरुणकुमार गायकवाड यांनी दिली. मात्र, गोवराचा डी८ हा विषाणू असून, सध्या मुंबईमध्ये सापडत असलेल्या गोवराच्या रुग्णांमधील विषाणूमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षण अधिकारी डॉ. मिता यांनी सांगितले. सीरो सर्वेक्षण करण्याचा विचार करोनामध्ये समूह प्रतिकारशक्ती किती निर्माण झाली आहे, हे तपासण्यासाठी मुंबईत सीरो सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याने करोनाला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे गोवराला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यावर उपायांची दिशा ठरवण्यासाठी सीरो सर्वेक्षण करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती युनिसेफच्या सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. मिता यांनी दिली. या संदर्भातील चर्चा प्राथमिक टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.