प्रियकराच्या साथीने पतीचं अपहरण, तिघांच्या साथीने विवाहितेने नवऱ्यासोबत भयंकर कृत्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 3, 2022

प्रियकराच्या साथीने पतीचं अपहरण, तिघांच्या साथीने विवाहितेने नवऱ्यासोबत भयंकर कृत्य

https://ift.tt/v4K8s3q
नांदेड : प्रियकराच्या साथीने पतीचं अपहरण करुन विवाहितेने त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडमधील मालेगाव रोड परिसरात मारहाणीचा प्रकार घडला. मुलाच्या ताब्यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद झडत असत. यावरुनच महिलेने प्रियकर आणि अन्य तिघांच्या मदतीने पतीचे अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या पत्नीसह इतर तीन आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गीतांजली हाके, बालाजी जाधव, दिलीपसिंघ पवार, अवतारसिंघ रामगडीया, अमोल भुक्तरे अशी या पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. मुलाच्या ताब्यावरून पती प्रकाश श्रीरामे आणि पत्नी गीतांजली हाके यांच्यात नेहमी वाद होत असत. मुलांचा ताबा देण्यास नकार दिल्याने गुरुवारी पत्नी गीतांजली हाके हिने प्रियकर आणि इतर साथीदारांच्या मदतीने पती प्रकाश श्रीरामे यांचे अपहरण केले. अपहरण करुन सौरभ बार मालेगाव रोड परिसरात नेऊन श्रीरामे यांना जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित पतीच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी पत्नी गीतांजली हाके, बालाजी जाधव, दिलीपसिंघ पवार, अवतारसिंघ रामगडीया, अमोल भुक्तरे यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेच्या काही तासातच सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी न्यायालयात या आरोपींना हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपीना ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हेही वाचा : दरम्यान, कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यामुळे नाशिकमधील प्रेमी युगुल गोव्याला पळून गेल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. तिथे जाऊन दोघांनी बनावट ओळखपत्राच्या आधारे एका लॉजवर रुम बूक केली. त्यानंतर त्यांनी आयुष्याची अखेर करण्याचा टोकाचा निर्णय घेतलेला. विष प्राशन केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला, तर तरुणी बचावली. मयत प्रियकर २१ वर्षांचा होता, तर प्रेयसी २२ वर्षांची आहे. हेही वाचा :