
: जिल्हयातील दापोली तालुक्यात वाकवली येथे एका ६७ वर्षीय वृद्धाचा अंगावर माती कोसळून गाडले गेल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव रामचंद्र यशवंत जाधव (६७) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. रमेश यशवंत जाधव यांनी याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात याची खबर दिली आहे. यातील खबर देणारे रमेश यशवंत जाधव याचे मृत भाऊ रामचंद्र यशवंत जाधव ( ६७) यांचे वाकवली गावी श्रीकृष्णनगर येथे सर्वे नं ९१/६ या जागेत पेट्रोलपंप बांधण्याकरिता साफसफाईचे काम चालू होते. या पेट्रोल पंपाच्या टाकीचे खोदाईकाम जेसीबीच्या सहाय्याने सुरू होते. त्यावेळी रामचंद्र जाधव हे चर मारलेल्या जागेत उन असल्याने सावलीला चरात बसले होते. क्लिक करा आणि वाचा- त्यावेळी अचानक माती कोसळली. त्या मातीत रामचंद्र यशवंत जाधव हे गाडले गेले. ही दुर्घटना घडल्याबरोबर सगळ्यांची एकच धावपळ उडाली. तत्काळ तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले. गाडले गेलेले रामचंद्र जाधव यांना फावड्याच्या सहाय्याने मातीतून बाहेर काढले गेले. मात्र त्यांना बाहेर काढल्यानंतर ते बेशुध्द अवस्थेत असल्याचे सर्वांना दिलले. त्यानंतर तातडीने त्यांना उपचाराकरीता दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांची प्राणज्योत मालवली होती. क्लिक करा आणि वाचा- उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रामचंद्र यशवंत जाधव यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात खबर दाखल केली आहे. महिला पोलीस नाईक सुहासिनी मांडवकर यांनी याची नोंद दाखल केली असून अधिक तपास पोलीस नाईक नलवडे करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-