: पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळील उड्डाण पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह पनवेल तालुका पोलिसांना सापडला आहे. हा मृतदेह धामणी गावाजवळील उड्डाण पुलाच्या खाली आढळून आलेला असून या या महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या पिलरला हा मृतदेह अडकला होता. तसेच ह्या पिलरच्या आजूबाजूला पाणी साचलेले असून मृत महिलेचे तोंड पिलरला अडकून राहिले होते. या महिलेची हत्या अज्ञात व्यक्तीने करून त्यांनतर ती व्यक्ती तिथून पळून गेली असल्याचे समजते. धामणी उड्डाण पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर तात्काळ तालुका पोलिस आणि ठाण्याचे अधिकारी कर्मकचारी घटनास्थळी पोहचून त्या महिलेला उड्डाण पुलाच्या बाहेर काढण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- एका अनोळखी महिलेचा मृतदेह धामणी गावातील उड्डाण पुलाजवळ आढळल्याचे समजताच परिसरामध्ये खळबळ उडाली . या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहचले. महिलेचा मृतदेह उड्डाणपुलाच्या खाली पिलर जवळील पाण्यामध्ये डोके होते. मृतदेह धामणी गावाजवळील उड्डाण पुलाच्या खाली आढळून आलेला असून ह्या या महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ह्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून आजूबाजूच्या परिसरातील बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पनवेल तालुका पोलिसांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- मालगुंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या धामणी गावातील उड्डाण पुलाजवळ महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे समजताच संपूर्ण धामणी गावामध्ये खळबळ उडाली. पनवेल तालुका पोलीस या महिलेच्या मृतदेहाबाबत अधिक तपास करत असल्याचे पनवेल तालुका पोलिसांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-