
मुंबई: या नावाने प्रसिद्ध रिलायन्स समूहाचे अध्यक्ष दिवंगत धीरजलाल हिराचंद अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची पायाभरणी करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातच्या चोरवाड येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी होते. आज त्यांची दोन मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी उभारलेला व्यवसाय सांभाळत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना करणाऱ्या धीरूभाई यांचे फक्त दहावीपर्यंतच शिक्षण झाले असून आपली जिद्द आणि मेहनतीच्या बळावर भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून उदयास आले. धीरूभाई अंबानी यांच्या यशाची कहाणीचा प्रारंभिक ३०० रुपयांच्या पगाराने सुरु झाला पण आपल्या मेहनतीच्या जोरावर ते काही कमी वयातच कोट्यवधींचे मालक बनले. त्यांच्यानंतर त्यांची दोन मुले - मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी उद्योग जगतातील यशस्वी उद्योगपतींच्या पंक्तीत उभी झाली. बाजाराची अचूक ओळख धीरूभाई अंबानींना मार्केटची चांगली माहिती होती. पॉलिस्टरला भारतात आणि भारतीय मसाल्यांना परदेशात सर्वाधिक मागणी असल्याचे त्यांना कळून चुकले होते. येथून व्यवसायाची कल्पना त्यांना सुचली. त्यांनी युक्ती लावली आणि रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन ही कंपनी सुरू केली, ज्याने परदेशात भारतीय मसाले आणि परदेशी पॉलिस्टर भारतात विकण्यास सुरुवात केली. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले २००० मध्येच धीरूभाई देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले. पण ते अधिक काळ या पदाचा आस्वाद घेऊ शकले नाही. ६ जुलै २०२२ रोजी काळाने घात केला आणि मुंबईतील एका इस्पितळात धीरूभाई यांनी अखेरचा श्वास घेतला. १ टेबल, ३ खुर्ची, २ सहकारी धीरूभाई यांचे ऑफिस ३५० स्क्वेअर फुटांची खोली होती ज्यात एक टेबल, तीन खुर्च्या, दोन सहाय्यक आणि एक टेलिफोन होता. जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक, धीरूभाई अंबानी यांची दैनंदिन दिनचर्याही याने निश्चित केली. त्यांनी कधीही १० तासांपेक्षा जास्त काम केले नाही. इंडिया टुडे मासिकाने आपल्या एका लेखात लिहिले की, धीरूभाई अंबानी दररोज फक्त १० तास काम करायचे. मासिकानुसार, धीरूभाई म्हणायचे, "जो म्हणतो की तो १२ ते १६ तास काम करतो. तो एकतर खोटारडा आहे किंवा त्याची गती अतिशय मंद आहे."