
पुणे : बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे खासगी क्लासच्या बसचा अपघात झाला आहे. यात ३ मुली गंभीर तर २४ मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. शिर्डीवरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करत असताना हा भीषण अपघात झाला आहे. इचलकरंजी येथील सागर क्लासेसमधील ८वी ते १०वी क्लासच्या मुलींची सहल औरंगाबाद आणि शिर्डी अशी आयोजित केली होती. शिर्डी येथून परत इचलकरंजी येथे जाताना यशोदा ट्रॅव्हल्स नावाची ही बस बारामती पुढे पाहुणेवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एका चारीत गेल्यामुळे २४ मुली किरकोळ व ३ मुली गंभीर जखमी आहेत. झोपेची डुलकी आल्याने बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ४८ मुली व ५ स्टाफ मेंबर होते. जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.