
: बांगलादेशातल्या तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून टाकून सांगलीच्या वेश्यावस्तीमध्ये देहविक्रीसाठी आणलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे, तर या बांगलादेशी तरुणींचे, महिलांचे बनावट आधार कार्ड देखील बनवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आता या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. सांगली आणि मिरज शहरामध्ये जवळपास तीन मोठ्या वेश्यावस्ती आहेत. या ठिकाणी महिलांचा देहविक्रीचा व्यवसाय चालतो. सांगली शहरातल्या टिंबर एरियातल्या गोकुळ नगर, स्वरूप टाकीज जवळचे सुंदर नगर आणि मिरज शहरातले प्रेम नगर, या तीन रेड लाईट एरियामध्ये स्थानिक आणि कर्नाटक इथल्या महिलांच्या बरोबर आता बांगलादेशी तरुणी आणि महिलांच्याकडूनही वेश्याव्यवसाय करून जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रॅकेटच्या माध्यमातून बांगलादेशातल्या तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून या ठिकाणी आणत त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करणारी टोळी कार्यरत असल्याचं समोर आला आहे. बांगलादेश ते सांगलीपर्यंत तरुणींना आणून त्यांची विक्री करण्यापर्यंतचे एक मोठे रॅकेट असल्याचेही धक्कादायक माहिती पुढे आली. तरुणींची विक्री झाल्यानंतर त्यांना वेश्या व्यवसाय करायला लावलं जातं. इतकंच नव्हे तर पोलिसांच्याकडून जर छापा टाकून बांगलादेश तरुणींना पकडण्यात आलं, तर त्यांचे भारतीय असल्याचा पुरावा म्हणून बनावट आधार कार्ड दाखवून सोडवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्लिक करा आणि वाचा- आता या बांगलादेशी तरुणींच्या विक्री आणि वेश्याव्यवसायाप्रकरणी कार्यरत असणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाईची भूमिका घेण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा-