असह्य वेदना, तरुणाच्या पोटात वोडकाची बाटली पाहून डॉक्टरही हादरले, अडीच तासांची शस्त्रक्रिया अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 12, 2023

असह्य वेदना, तरुणाच्या पोटात वोडकाची बाटली पाहून डॉक्टरही हादरले, अडीच तासांची शस्त्रक्रिया अन्...

https://ift.tt/heb1jwD
काठमांडू: नेपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका २६ वर्षीय तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी वोडकाची बाटली काढली आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन या तरुणाच्या पोटातून ही वोडकाची बाटली काढली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. रौतहाट जिल्ह्यातील गुजरा नगरपालिकेतील नुरसाद मन्सुरी यांच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या पोटात ही वोडकाची बाटली असल्याचं पुढे आलं.हिमालयन टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाला पाच दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर अडीच तास शस्त्रक्रिया करून ही वोडकाची बाटली यशस्वीरित्या बाहेर काढली होती. याबाबत एका डॉक्टरने सांगितले की, "त्या बाटलीमुळे त्याच्या आतड्या फाटल्या होत्या. त्यामुळे त्याची विष्ठा बाहेर पडली होती आणि आतड्यांना सूज आली होती. पण आता शस्त्रक्रियेनंतर तो धोक्याबाहेर आहे." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूरसादच्या मित्रांनी त्याला दारु पिण्यास भाग पाडले असावे आणि त्याच्या मागच्या भागातून जबरदस्तीने त्याच्या पोटात बाटली घुसवली असावी, असा संशय पोलिसांना आहे. अहवालात म्हटले आहे की, नूरसादच्या पोटात मागच्या भागातून बाटली घातली गेल्याचा संशय आहे.याप्रकरणी रौतहाट पोलिसांनी शेख समीम नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तसेच, पोलिसांनी नूरसादच्या काही मित्रांचीही चौकशीही केली आहे. "आम्हाला समीमवर संशय असल्याने आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी करत आहोत," असं पोलिसांनी सांगितलं आहे. रौतहाटचे पोलीस अधीक्षक बीर बहादूर बुधा मगर यांनी सांगितले की, नूरसादचे आणखी काही मित्र फरार असून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.