'मिस यू डार्लिंग' इन्स्टावर अखेरची पोस्ट, मैत्रिणीच्या मृत्यूनंतर मित्रानेही संपवलं जीवन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 18, 2023

'मिस यू डार्लिंग' इन्स्टावर अखेरची पोस्ट, मैत्रिणीच्या मृत्यूनंतर मित्रानेही संपवलं जीवन

https://ift.tt/qtEeIfv
पुणे : येरवडा येथे दोन दिवसांपूर्वी एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आपल्या मैत्रिणीचा मृत्यू सहन न झाल्याने मित्राने आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. जयेश रामदास मंगळवेढेकर (वय २०, राहणार खराळवाडी, पिंपरी) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. येरवडा येथे एक तरुणी आपल्या मित्र-मैत्रीणींना भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने येरवड्याच्या कल्याणीनगर भागात एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. संबधित तरुणी ही पिंपरी येथील खराळवाडी येथील राहणारी होती. संबधित तरुणीचा मित्र जयेश हा तिथेच रहात होता. जयेश आणि आत्महत्या केलेल्या तरुणीचे प्रेम संबंध होते, अशी माहिती समोर येत आहे. मैत्रिणीच्या मृत्यूचा धक्का जयेशला सहन न झाल्याने त्याने आपले जीवन संपले अशी माहिती समोर येत आहे. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी जयेश याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मृत तरुणीचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्याने भावनिक पोस्ट टाकली आणि जीवन संपवलं.जयेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'मिस यू डार्लिंग' का सोडून गेलीस तू? अशा आशयाची पोस्ट केली. ही पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याने प्रथम दोन्ही हाताच्या नसा कापल्या, तरीही जीव जात नाही हे पाहून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांकडून तपास करण्याचे काम सुरू आहे. या घटनेने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली होती. कारण मैत्रिणीने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या जाण्याने मात्र मित्राने स्वतःला संपवले. ही धक्कादायक घटना अंगावर शहारे आणणारी आहे.