वडिलांनी फोन घेतला, मुलाला राग आला; १७ व्या मजल्यावरुन उडी घेत होता, तेवढ्यात हात सुटला अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 6, 2023

वडिलांनी फोन घेतला, मुलाला राग आला; १७ व्या मजल्यावरुन उडी घेत होता, तेवढ्यात हात सुटला अन्...

https://ift.tt/Hgzs58a
सिंगापूर: तुमच्या वडिलांनी तुमचा फोन हिसकावून घेतला तर तुम्ही काय कराल. आपल्यापैकी अनेकजण शाळा-कॉलेजमध्ये शिकत होते किंवा अजूनही शिकत आहेत. तेव्हा सर्वांच्या घरी एक प्रसंग नक्की घडला असेल, जिथे आई किंवा वडिलांनी आपल्याला मोबाईचा अधिक वापर करण्यासाठी रागावलं असेल. कधी-कधी अभ्यास कर म्हणत काही काळासाठी फोन आपल्यापासून काढून घेतला असेल. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत घडलं असेल. तेव्हा तुम्ही काय करता. तुम्ही अभ्यास कराल. पण, यंदा काही मुलांमध्ये इतका राग आणि हट्ट आहे की त्यांना फक्त त्यांच्या मनासारखं सारं हवं असतात. नाहीतर ते आत्महत्या सारखं पाऊल घ्यायलाही विचार करत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे वडिलांनी फोन आणि आयपॅड हिसकावला म्हणून मुलाला इतका राग आला की त्याने १७ व्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि अचानक त्याचा हात सुटला. पाहा हा थरारक व्हिडिओ-हा व्हिडिओ सिंगापूरचा असल्याची माहिती आहे. व्हिडिोमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक मुलगा खिडकीतून बाहेर आल्याचं दिसत आहे. तो खिडकीबाहेरुन उडी मारणार असल्याचं दिसत आहे. आयफोन आणि आयपॅड परत न केल्यास तो उडी मारून आत्महत्या करेल, अशी धमकी तो त्याच्या पालकांना देताना दिसतो. तेवढ्यात त्याचा हात सुटतो आणि तो १७ व्या मजल्यावरुन थेट खाली कोसळतो. मात्र, सुदैवाने त्याच्या पालकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. काही मिनिटांतच त्याला वाचवण्याची व्यवस्था करण्यात आली. इमारतीच्या खाली खादी बसवण्यात आली आणि तो त्या गादीवर येऊन पडला आणि वाचला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या हृदयाचे ठोके अतिशय वेगवान झाल्याचं आढळून आलं होत्, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका होता. त्याला दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत ७.८ लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे.