BSFच्या निवृत्त जवानाची भर चौकात महिलेला मारहाण; जरीपटक्यातील घटनेचा VIDEO व्हायरल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 19, 2023

BSFच्या निवृत्त जवानाची भर चौकात महिलेला मारहाण; जरीपटक्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

https://ift.tt/Q0Y9vKJ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भरचौकात ३७वर्षीय महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या निवृत्त जवानाला जरीपटका पोलिसांनी अटक केली. हृदयविकाराचा आजार असल्याने सूचनापत्र देऊन त्याला सोडले. शिवशंकर श्रीवास्तव (वय ४८) असे अटकेतील जवानाचे नाव आहे.अशी आहे घटनाशिवशंकर हा दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाला. शुक्रवारी दुपारी तो कारने (एमएच-४० : सीएच ०१३५) जात होत. याचवेळी मोपेडवर ही महिला दोन वर्षांच्या मुलासोबत जात होती. इंदोऱ्यातील भीमचौकात शिवशंकरने कार महिलेच्या गाडीजवळ आणली. महिला घाबरली. तिने त्याला जाब विचारला. शिवशंकरने कार थांबवली. माहिला गाडीवरून खाली उरतली. मोबाइलद्वारे कारच्या नंबरप्लेटचे छायाचित्र काढायला सुरुवात केली. हे बघून शिवशंकर संतापला व कारमधून खाली उतरला. महिलेला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. नागरिकांनी मध्यस्थी करीत त्याला पकडले. त्याने नागरिकांनाही शिवीगाळ केली. दरम्यान, एकाने मारहाणीची मोबाइलद्वारे चित्रफीत काढून व्हायरल केली. याचवेळी जरीपटका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल तेथून जात होते. त्यांना येथील वाहतूक जाम दिसली. त्यांनी ती सुरळीत केली. महिला रस्त्याच्या बाजूला उभी होती. तिने बाकल यांना बोलाविले व घटनेची माहिती दिली. त्यानंतर बाकल यांनी वैद्यकीय तपासणी केली. महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग, शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला, जवानाला अटक केली. त्याला हृदयविकाराचा आजार असल्याचे दस्तऐवज नातेवाइकांनी पोलिसांना दाखविले. सूचनापत्र देऊन पोलिसांनी त्याला सोडले.