
अहमदाबाद: बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ मधील अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे शुखरवरसुन खेळवला जात आहे. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४ बाद २५५ धावांची ताबडतोड फलंदाजी केली. ख्वाजा भारताविरूध्द शतक झळकावत नाबाद आहे. आज दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांवर नजर असेल. ( 4th Test 2nd Day Live) चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह अपडेट्स>> दुसऱ्या दिवशीचा खेळाला सुरुवातदुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारताकडून प्रथम जडेजा गोलंदाजी करत आहे. तर ख्वाजा आणि ग्रीनची जोडी मैदानात कायम आहे.>> पहिला दिवस ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजा आणि युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनची जोडी मैदानात असून ग्रीनसुद्धा आपल्या अर्धशतकाच्या जवळ आहे. पहिल्या दिवशी त्याने ४९ धावा केल्या होत्या. यासोबतच भारताकडून मोहम्मद शमीने २ तर रवींद्र जडेजा आणि अश्विनने १-१ विकेट घेतली. मात्र, या खेळपट्टीवर विकेट मिळविण्यासाठी भारतीय गोलंदाजांची धडपड सुरू आहे. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात ४०० पेक्षा अधिक धावांचा आकडा गाठू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. भारतासाठी हा कसोटी सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे. भारताने जर हा कसोटी समाने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत पोहोचू शकेल. >> भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव.>> ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (क), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनमन, नॅथन लायन.