चेन्नईचा हिरा मराठी राजवर्धन हंगरगेकर आहे तरी कोण, द्रविड यांचाही आहे फेव्हरेट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 1, 2023

चेन्नईचा हिरा मराठी राजवर्धन हंगरगेकर आहे तरी कोण, द्रविड यांचाही आहे फेव्हरेट

https://ift.tt/qo9XzWS
अहमदाबाद : चेन्नईसाठी या सामन्यात हिरो ठरला तो महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर. कारण चेन्नईला जेव्हा या सामन्यात विकेट्ची गरज होती तेव्हा त्याने संघाला निराश केले नाही. राजवर्धन चेन्नईच्या संघात असला तरी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही तो आवडता खेळाडू होता.राजवर्धनचे नाव पहिल्यांदा समोर आले जेव्हा भारतीय संघ २०२० साली १९ वर्षांखालील विश्वचषक खेळण्यासाठी जाणार होता. या संघाची घोषणा झाली आणि त्यानंतर राजवर्धनचे नाव पाहिल्यावर बऱ्याच जणांनी त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. राजवर्धन हा मूळचा तुळजापूरचा. पण तुळजापूरमध्ये तो जास्त राहीला नाही. तिथून तो पुण्याला आला आणि तिथे त्याने क्रिकेटचे व्यावसायिक धडे गिरवायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अनुभवी खेळाडूंच्या मुशीत तो घडत गेला आणि थेट युवा विश्वचषकाच्या संघात जाऊन बसला. हा विश्वचषक ज्या ३-४ खेळाडूंनी गाजवला त्यामध्ये राजवर्धनचेही नाव होते. राजवर्धन हा एक वेगवान गोलंदाज म्हणून यावेळी सर्वांसमोर आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर त्याने अचूक आणि भेदक मारा करत सर्वांची मनं जिंकली होती. या विश्वचषकात आपण धडाकेबाज फलंदाजी करू शकतो, हेदेखील त्याने दाखवून दिले होते. भारताने हा विश्वचषक जिंकला आणि त्यामध्ये राजवर्धनचाही मोलाचा वाटा होता.या विश्वचषकानंतर काही काळ तो कुठेच दिसला नाही. पण आयपीएलच्या लिलावात चेन्नईच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घ्यायचे ठरवले होते. त्यासाठी चेन्नईने तब्बल १ कोटी ५० लाख रुपये मोजले. त्यामुळे राजवर्धन आपल्या पहिल्याच आयपीएलमध्ये करोडपती झाला होता. त्यामुळे तो आता कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. धोनीने या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात त्याला संधी दिली आणि त्यानेही संधीचे सोने केले. कारण चेन्नईला जेव्हा विकेट्सची सुरुवातीला गरज होती तेव्हा त्याने संघाला दोन बळी मिळवून दिले.पहिल्या सामन्यात कोणता संघ जिंकला, यापेक्षा सर्वात जास्त चर्चा होती ती राजवर्धनची. त्यामुळे या हंगामात तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.