भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार राष्ट्रवादीत येणार, पवारांच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्षाचा गौप्यस्फोट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 16, 2023

भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार राष्ट्रवादीत येणार, पवारांच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्षाचा गौप्यस्फोट

https://ift.tt/zNmf791
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या ४०-४५ जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नुकताच गमावला आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी घड्याळ चिन्ह वापरण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसनं केद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. त्याला निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे. यानंतर आणखी एक मोठी घडामोड घडलीय. कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख हरी आर यांनी भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रसच्या कर्नाटकमधील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर हरी आर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. कर्नाटकमधील २२४ जागांपैकी ४० मतदारसंघात निवडणूक लढेल, असं ते म्हणाले. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या एका विधानपरिषद आमदारानं राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे विद्यमान चार ते पाच आमदार संपर्कात असून भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं हरी आर यांनी सांगितलं. ते मुंबईत बोलत होते. कर्नाटक प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. भाजपचे अनेक नेते राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा मान्य झाल्यानं पक्षात प्रवेश करणार आहेत, असं हरी आर म्हणाले. सीमाभागातील मराठी भाषिक प्रदेशाच्या पुढं जाऊन कर्नाटकातील विविध भागात निवडणूक लढवणार असल्याचं हरी आर यांनी म्हटलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तर, १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं १४ जागांवर निवडणूक लढवली होती.