आगीशी खेळ! मुंबई अग्निमन दलाच्या तपासणीत त्रुटी उघड; इमारती अन् हॉटेलमालकांना नोटीस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 15, 2023

आगीशी खेळ! मुंबई अग्निमन दलाच्या तपासणीत त्रुटी उघड; इमारती अन् हॉटेलमालकांना नोटीस

https://ift.tt/GAFWKko
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अग्निशमन दलाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या तपासणीत मुंबईतील ४४ इमारती, हॉटेल्समध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. अग्निशमन यंत्रणा कार्यरत किंवा सुस्थितीत करण्याची नोटीस या ४४ इमारतींच्या सोसायटी आणि हॉटेल्समालकांना बजावण्यात आली आहे. या यंत्रणा सुस्थितीत न आणल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई त्यांच्यावर होणार आहे. सध्या मात्र शहरातील उत्तुंग इमारती आणि हॉटेलमध्ये जीवाशी खेळ सुरू असल्याचेच चित्र दिसत आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी, उत्तुंग इमारती, हॉटेल, लहान-मोठे कारखाने आहेत. या प्रत्येक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवावी, असे निर्देश मुंबई पालिकेकडून नेहमीच देण्यात येतात. या यंत्रणांची देखभाल-दुरूस्ती होणे आवश्यक असते. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास या यंत्रणा कुचकामीच ठरतात. मुंबई अग्निशमन दलाकडून अचानक तपासणी मोहीमही हाती घेण्यात येते. या यंत्रणा सुस्थितीत नसल्यास त्यावेळी कारवाईला सामोरे जावे लागते. अग्निशमन दलाने ६ एप्रिल ते ८ एप्रिल या काळात ६४ इमारती आणि ३८४ हॉटेल्समधील अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहेत की नाही याची तपासणी केली. यापैकी ४६ इमारती आणि ३५८ हॉटेल्समध्ये यंत्रणा सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. तर १८ इमारती आणि २६ हॉटेल्समध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरतच नसल्याने त्या यंत्रणा कार्यान्वित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. १२० दिवसांत यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना केली असून त्यानंतरही पालन न केल्यास वीजपुरवठा खंडित करणे, पाणीकपात अशी कारवाई करण्याशिवाय पर्याय नसेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.‘प्रमाणपत्र सादर करा’मुंबईतील रहिवासी इमारती आणि आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र (नमुना ब) मुंबई महापालिकेच्या (https://ift.tt/nwFKHiC) संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इमारत किंवा इमारतीच्या भागामधील आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील प्रस्थापित अग्निशमन यंत्रणा उत्तम स्थितीत असल्याबाबत परवानाप्राप्त अभिकारणाकडून सहामाही प्रमाणपत्र (नमुना ब) वर्षातून दोनदा जानेवारी व जुलै महिन्यांत घेणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रमाणपत्र इमारतीचे मालक आणि भोगवटादार यांनी महापालिका संकेतस्थळावर सादर करावे, असे महापालिकेने म्हटले आहे.२२व्या मजल्यापर्यंत जाणारी शिडीउंच इमारतींना आग लागल्यास आग विझवण्यासाठी एक विशेष वाहन मुलुंड अग्निशमन केंद्राच्या ताफ्यात गुरूवारी दाखल झाले आहे. या वाहनावर ६४ मीटर उंचीपर्यंत म्हणजेच २२व्या मजल्यापर्यंत जाऊ शकेल, अशी शिडी आहे. सध्या या केंद्रात १५ ते १६ व्या मजल्यापर्यंत जाईल, अशी एकच शिडी आहे. मुलुंडमध्ये उभ्या राहणाऱ्या उत्तुंग इमारतींमुळे हे नवीन वाहन वरदानच ठरणार आहे.अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह१४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान मुंबई अग्निशमन दलाकडून ‘अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या सप्ताहात अग्निशमन दलाकडून विविध स्पर्धा, प्रात्यक्षिके, पथसंचलनासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अग्निशमन दलाच्या साहित्य आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही आकर्षण ठरणार आहे. १५ एप्रिल रोजी विक्रोळी येथील आर सीटी मॉल येथे अग्निशमन दलाकडून साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध ठिकाणीही प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.सातत्याने आगीच्या घटनाजानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आगीच्या मोठ्या, किरकोळ, सौम्य स्वरूपाच्या एकूण ७५०हून अधिक घटना घडल्या आहेत. यापैकी सदोष वायरिंग आणि निष्काळजीपणामुळे धूम्रपान करताना लागलेल्या आगीच्या घटना अधिक आहेत.