
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर वसई यार्डमध्ये रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ ते शनिवारी पहाटे ३.३०पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असल्याने पश्चिम रेल्वेवर उद्या, रविवारी ब्लॉक असणार नाही. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही फेऱ्या विलंबाने धावणार आहे.मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)स्थानक : माटुंगा ते मुलुंडमार्ग : अप आणि डाऊन जलदवेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५परिणाम : ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहे.