
बदाऊन : देशात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. इथे एका उंदराला जीवे मारणाऱ्या आरोपीविरोधात तब्बल ३० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोज नावाच्या व्यक्तीने २५ नोव्हेंबर २०२२ रोजी एका उंदराला दगडाला बांधलं आणि नाल्यात फेकून दिलं. यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा कोर्टात खटला चालणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे न्यायालय यावर काय न्याय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका मनोज नावाच्या व्यक्तिने उंदराच्या शेपटीला दगड बांधला आणि त्याला नाल्यामध्ये फेकलं. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यावेळी प्राणीप्रेमीने मनोजला विरोध केला पण तरीदेखील त्याने उंदराला मारले. यावेळी प्राणीप्रेमी विकेंद्र याने उंदराचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला आणि पोलिसांनी चक्क त्याने पोस्टमार्टम केले.गुदमरल्याने उंदराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मनोज याला ताब्यात घेतले. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती आहे. दरम्यान, उंदीर मारून आपण कोणतीही मोठी चूक केली नाही असं मनोजचं मत आहे. तो उंदीर मला त्रास देत होता, त्यामुळे त्याला मारलं. जर उंदीर मारल्यावर गुन्हा दाखल होत असेल तर कोंबडी, बकरी आणि इतर प्राण्यांना मारल्याचेही गुन्हे दाखल करावे, असं त्याने म्हटलं.