चीनची ढासळती स्थिती, अदानींच्या शेअर्सनी बदलला खेळ; भारतीय शेअर मार्केटची उंच भरारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 30, 2023

चीनची ढासळती स्थिती, अदानींच्या शेअर्सनी बदलला खेळ; भारतीय शेअर मार्केटची उंच भरारी

https://ift.tt/rTdFBYL
मुंबई : कर्ज मर्यादेच्या मुद्द्यावर अमेरिकेने सहमती दर्शविल्यानंतर सोमवारी भारतीय शेअर मार्केटने मोठी तेजी नोंदवली. सोमवारच्या व्यवहार सत्रात सेन्सेक्सने ६३ हजार अंकांचा टप्पा ओलांडला होता. त्याच वेळी निफ्टी १८,६०० अंकांजवळ पोहोचला होता. दिवसाच्या व्यवहार सत्रादरम्यान बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये चांगली खरेदी दिसून आली. बाजारातील सकारात्मक कामकाजामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.०७ लाख कोटी रुपयांची भर पडली. देशांतर्गत बाजारात नुकत्याच झालेल्या तेजीच्या जोरावर भारत पुन्हा एकदा जगातील पाचवा मोठा शेअर बाजार बनला आहे. भारत पुन्हा जगातील पाचवा मोठा शेअर बाजारफ्रांसला मागे टाकत भारत पुन्हा एकदा जगातील पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील तेजीमुळे भारताने फ्रान्सला मागे टाकत पुन्हा आपले स्थान मिळवले आहे. जानेवारीमध्ये फ्रान्सने या क्रमवारीत भारताला मागे टाकले होते, पण २८ मार्चपासून भारतीय मार्केटमध्ये सातत्याने वाढीसह व्यवहार होत असून या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात जवळपास १०% वाढ झाली. अदानी समूहाच्या शेअर्समधील वाढ आणि परदेशी गुंतवणूक भारतीय मार्केटच्या उसळीसाठी महत्त्वाची ठरली. तसेच चीनमधील ढासळत्या आर्थिक बदलांचाही भारताला फायदा मिळत आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने सुमारे १५% उसळी घेतली. एप्रिलनंतर मे महिन्यातही देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली असून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) या महिन्यात भारतीय इक्विटी मार्केटमध्ये आतापर्यंत ३७,३१६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मजबूत समष्टि आर्थिक मूलभूत तत्त्वे आणि स्टॉकच्या वाजवी मूल्यांकनामुळे हे घडले आहे. गेल्या दोन महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे $६.३ अब्ज भारतीय शेअर्सची खरेदी केली आहे. भारतीय मार्केटचे मूल्यांकनदरम्यान, अलीकडच्या तेजीमुळे भारताचे बाजार भांडवल $३.३१ ट्रिलियनवर पोहोचले असून यासह भारत पुन्हा एकदा जगातील पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. या वर्षी, देशाचे बाजार मूल्य सुमारे $३३० अब्ज वाढले आहे. लक्षात घ्या की ४४.५४ ट्रिलियन डॉलर्सच्या बाजारमूल्यासह अमेरिका जगातील अव्वल शेअर मार्केट तर चीन १०.२६ ट्रिलियन डॉलर्ससह दुसऱ्या आणि जपान ५.६८ ट्रिलियन डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच हाँगकाँग शेअर बाजाराचे मार्केट कॅप $५.१४ ट्रिलियन आणि ३.२४ ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह फ्रान्स आता भारताच्या खाली सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.भारतीय मार्केट उच्चांक गाठणारविदेशी ब्रोकरेज फर्म जेफरीजने बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स १,००,००० अंकांपर्यंत पोहोचण्याची आशा व्यक्त केली आहे. जेफरीजने पुढील पाच वर्षांत प्रति शेअर १५% कमाई वाढीच्या अंदाजानुसार हे सांगितले असून सध्या गुंतवणूकदार आता मार्च तिमाहीच्या GDP डेटाची वाट पाहत आहेत, जे ३१ मे रोजी प्रदर्शित होईल. याचा बाजारातील भावना आणि गुंतवणुकीच्या निर्णयांवर आणखी परिणाम होईल.