
जळगाव : लोकप्रिय नृत्यांगना हिच्या आडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप नोंदवल्यानंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व महिलांना स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. सर्वांनी महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कलाकार म्हणून गौतमी पाटील हिच्या पाठीशीही उभं राहिलं पाहिजे, असंं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या कलेचं समर्थन केलं आहे.गौतमी पाटील हिने तिचं पाटील आडनाव काढावं अशी काही संघटनांकडून मागणी केली जाते या विषयावर बोलतांना संभाजी राजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व दाखविले, हे सांगत असतांना संभाजीराजे यांनी इतिहासातील महाराणी ताराबाई यांचं उदाहरण दिलं. महाराणी ताराराणी यांनी ७ वर्षे औरंगजेबाशी लढा दिला, तेव्हापासून महिला सबलीकरण तेव्हापासून सुरु झालं आहे. शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं आहे. कलाकरांना संरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे, असं मत व्यक्त करत संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिचं समर्थन केलं आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज जळगावात आले होते. एका माध्यमाच्या वधार्पनदिनानिमित्ताने त्यांच्या प्रकटमुलाखतीच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते.संसदभवन सोहळ्यावर संभाजीराजेंचा टोलानव्या संसंदभवनाच्या उद्घाटना सोहळ्यावर देखील छत्रपतींनी भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी संसद भवनचे उद्घाटन केले. मात्र त्यांच्यासोबत राष्ट्रपती असते तर याची गरिमा वाढली असती, असा टोला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपला लगावला आहे. संभीजीराजेंना या संसद भवन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. यावर बोलतांना संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, ही लोकशाही आहे, छत्रपतींचा वंशज म्हणून मला बोलवंल नाही. ही अपेक्षा मी करत नाही, विरोधकांनी का बहिष्कार टाकला या नंतरच्या बाबी आहे, पण पंतप्रधानांबरोबरच राष्ट्रपती असले तर या कार्यक्रमाची गरीमा आणखी वाढली असती, अस संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. सिंदखेड राजा येथील किल्ल्याचा दगड घसरला, जुनी किल्ले हे जिवंत ठेवायचे असतील तर हे वेगळं महामंडळ किंवा वेगवेगळे मार्ग आहेत. मात्र ते होत नाही आणि हे दुर्दैवी आहे अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. संभाजीराजे यांची सरकारवर टीकाखोके, बोके, मांजर, कुत्रे ही भाषा ऐकल्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडावा यासाठी लोक अपेक्षा करताय स्वराज्य ही जागा भरून काढणार, असं मत व्यक्त संभाजीराजे यांनी सध्याच्या राजकारणावर तसेच सरकारवर विखारी टीका केली आहे. महाराष्ट्रात महापुरुषांनी जातीय विषमता नष्ट व्हावी म्हणून प्रयत्न केले, म्हणून बाकी राज्यात जसं जातीवर राजकारण चालंत तसं महाराष्ट्रात होवू नये अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी सध्याच्या राजकारणवर बोलतांना व्यक्त केली आहे. इतर राज्यात जातीवर राजकारण चालते. जातीवर आधारीत विषमता जर कमी करायची असेल बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. सध्या खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. त्याला लोक कंटाळले आहेत, असं सुध्दा संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. भाजप-शिंदे गटातील जागा वाटपावरुन गोंधळ, तसेच महाविकास आघाडीतील वाद याचा निश्चित स्वराज्य पक्षाला फायदा होईल असा विश्वास यावेळी संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. ईडीला मी घाबरत नाही, मी आयुष्यात चुकीचं काम केलंच नाही, तर घाबरायचं कशाला, ज्यांना घाबरायचं ते घाबरतील, असा टोलाही यावेळी संभाजीराजे यांनी लगावला आहे.