
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : ‘’ ही भूमिगत मार्गिका वेळेतच सुरू होईल, असे आश्वासन रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) जपानच्या राजदूतांना दिले आहे. मुंबईच्या दौऱ्यादरम्यान जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी या भूमिगत मेट्रोची पाहणीही केली.‘मेट्रो ३’ ही मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणारी मार्गिका आहे. उत्तरेकडे आरे ते दक्षिणेकडे कफ परेडपर्यंत ही मार्गिका आहे. या ३३.५ किमी मार्गिकेचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मार्गिकेवर एकूण २७ स्थानके आहेत. त्यातील २६ स्थानके भूमिगत आहेत. या स्थानकांची उभारणी सरासरी ८० टक्के पूर्ण झाली आहे. हा २३ हजार १३६ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. त्यातील १३ हजार २३५ कोटी रुपयांचे वित्त साहाय्य जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) माफक व्याजदरावर देऊ केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुझुकी यांनी या भूमिगत मार्गिकेची पाहणी केली.हिरोशी सुझुकी यांच्यासह मंत्री (आर्थिक) क्योको होकुगो, जपानच्या मुंबईसाठीच्या महावाणिज्यदूत डॉ. यासुकाता फुकाहोरी तसेच भारतातील जपानच्या दूतावासातील उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि जायकाचे प्रतिनिधी यांचा यामध्ये समावेश होता. या शिष्टमंडळाने ‘मेट्रो ३’च्या बीकेसी स्थानकाला भेट दिली. त्यावेळी भुयारी मार्गाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.