Phaltan Apmc News: बाजार समितीतील दलालांकडून टोमॅटो खरेदीत लुट; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 15, 2023

Phaltan Apmc News: बाजार समितीतील दलालांकडून टोमॅटो खरेदीत लुट; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

https://ift.tt/kY04E7j
म. टा. प्रतिनिधी, सातारा : एकीकडे टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले असताना सातारा जिल्ह्यातील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र, योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. याचा कारणास्तव चिडलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फलटण बाजार समितीने समितीच्या आवारात गोंधळ घातला म्हणून संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाची सत्ता आहे.सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत; तर बाजार समितीत टोमॅटोला दलालांकडून कमी भाव दिला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूकही करण्याचे प्रकार होत आहे. असाच प्रकार फलटण बाजार समितीत घडला आहे. टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. सागर देशपांडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. देशपांडे आपल्या शेतातील टॉमेटोची काही कॅरेट घेऊन बाजार समितीमध्ये आले होता. या वेळी त्यांना बाजार समितीमध्ये दलालाकडून ६० रुपये किलोचा भाव देण्यात आला. या शेतकऱ्याने आणलेला माल काही नागरिकांना फुकट वाटून टाकला. बाहेर रस्त्यावर टोमॅटोची किरकोळ विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ६० रुपये पावशेर असा भाव मिळतो. मग आमच्या टॉमेटोला किलोला ६० रुपये भाव देऊन आमची चेष्टा केली जाते आहे, असा आरोप करून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.