गणेश विसर्जन मिरवणुकीत सुतळी बॉम्ब लावला, फुटला का नाही म्हणून पाहायला गेला अन् डोळा गमावला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 30, 2023

गणेश विसर्जन मिरवणुकीत सुतळी बॉम्ब लावला, फुटला का नाही म्हणून पाहायला गेला अन् डोळा गमावला

https://ift.tt/vGweVS9
कोल्हापूर: गणेश विसर्जन मिरवणुकीत लोखंडी नळामध्ये लावलेला सुतळी बॉम्ब उडत का नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या तोंडावर अचानक सुतळी बॉम्ब फुटल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून सदर तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात काल एका बाजूला आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषात आणि उत्साहात निरोप दिला जात होता. तर दुसऱ्या बाजूला पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान गंभीर दुर्घटना घडली असून याबाबतचा व्हिडिओ आता समोर आला आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत लोखंडी नळामध्ये लावलेला सुतळी बॉम्ब उडत का नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या तोंडावर अचानक सुतळी बॉम्ब फुटल्याने तरुणाला एक डोळा गमवावा लागला असून भारत संभाजी चव्हाण (वय वर्ष २८) राहणार देवाळे तालुका पन्हाळा असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या दुर्घटनेत भारत चव्हाण याला आपला डावा डोळा गमावला असून ही घटना काल गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.काल गणेश विसर्जनानिमित्त कोडोली येथे विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. या मिरवणुकींमध्ये गणेश मंडळाकडून विविध देखावे आणि डॉल्बी सिस्टीम लावण्यात आली होते. तर या मिरवणुकीत गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. यामध्ये देवाळे गावातील भारत चव्हाण हा आपल्या कुटुंबासमवेत मिरवणूक पाहण्यासाठी कोडोली या गावामध्ये आला होता. दहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती. यावेळी एका मंडळातील युवकाने लोखंडी पाईपमध्ये सुतळी बॉम्ब लावला. मात्र, हा बॉम्ब का उडत नाहीय हे पाहण्यासाठी भारत चव्हाण पाईपजवळ गेला. मात्र, याच वेळी अचानक त्याच्या तोंडावर हा बॉम्ब फुटला. यात तो गंभीर जखमी झाला. शिवाय डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला यामुळे तो बेशुद्ध पडला. दरम्यान, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भारत चव्हाण याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, अपघातात भारत चव्हाण याला आपला डावा डोळा गमवावा लागला. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी भारत चव्हाण यांचा जबाब घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.