Income Tax: नोकरदार वर्गाला दिलासा! आयकर विभागाने बदलले नियम, मिळणार रेंट फ्री होमचा लाभ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 2, 2023

Income Tax: नोकरदार वर्गाला दिलासा! आयकर विभागाने बदलले नियम, मिळणार रेंट फ्री होमचा लाभ

https://ift.tt/cYh9KSX
नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी १ सप्टेंबरपासून नवा आयकर नियम लागू करण्यात आला आहे. पगारदार करदाते आणि कर्मचाऱ्यांसाठी अलीकडेच आयकर विभागाने मोठा दिलासा देत भाडेमुक्त राहण्यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केला होता. बहुतेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना राहण्याची सुविधा देत कंपनीच्या फ्लॅट किंवा घरात कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय करतात. कर्मचारी अशा ठिकाणचे भाडे देत नसतील तर त्यांना मोठा फायदा होईल. या कर्मचाऱ्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मोठा दिलासा दिला असून त्यांना रेंट फ्री होमचा लाभ मिळणार आहे.नोकरदारांसाठी नवा आयकर नियमकेंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) काही नियमात सूट दिल्याने कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. CBDT ने Perquisite Valuation ची मर्यादा घटवली आहे म्हणजे तुमच्या जर तुम्ही तुमच्या कंपनीच्या मालकीच्या घरात राहत असाल तर तुमच्या पगारातून त्याविषयीच्या करात आता कमी कपात होईल. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पगार येईल. हा नवीन नियम काल, १ सप्टेंबर २०२३ पासून लागू करण्यात आला आहे.नव्या आयकर नियामुळे होईल अधिक बचतदरम्यान, नव्या आयकर नियमाचा केंद्र आणि राज्य सरकारच्या तसेच अन्य संस्थेत काम कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा मिळेल. नव्या नियमांनुसार १५ लाखांपेक्षा जास्त पण ४० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये २०११ च्या जनगणनेनुसार ७.५% (१०% पेक्षा कमी) मजुरी देण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार मिळत आहे आणि नियोक्ताकडून निवासही मिळत आहे, त्यांना आता अधिक बचत करता येणार असून सुधारित दरामुळे त्यांचा करपात्र आधार कमी होणार आहे.नव्या नियमाचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल?आता आयकर विभागाने भाडेमुक्त निवासाच्या करपात्र मूल्यात कपात केल्याने कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर त्याचा फायदा या कर्मचाऱ्यांना घरासाठी कमी भाडे खर्च करावा लागेल कारण ज्यामुळे त्यांच्या पगारात जास्त बचत होईल आणि त्यांच्या टेक-होम पगारात वाढ होईल.