उलगुलान मोर्चामुळे आज नाशिकमधील वाहतुकीत मोठे बदल, या रस्त्यांवर नो एन्ट्री, पर्यायी मार्ग कोणते? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 12, 2023

उलगुलान मोर्चामुळे आज नाशिकमधील वाहतुकीत मोठे बदल, या रस्त्यांवर नो एन्ट्री, पर्यायी मार्ग कोणते?

https://ift.tt/aGdO0rg
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे काढण्यात येणाऱ्या उलगुलान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवर प्रवेश बंद केले आहेत. मोर्चात सुमारे एक लाख बांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आज, गुरुवारी (दि. १२) सकाळी अकरा वाजेपासून मोर्चा संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली. वाहतूक मार्गांत बदल केल्याने शहरातील इतर रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. त्यामुळे शहरातील उपरस्त्यांवर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.इथे प्रवेश बंद : रविवार कारंजा ते सांगली बँक सिग्नल - नेपाळी कॉर्नर - शालिमार - शिवाजी रोड - सीबीएस सिग्नल ते जिल्हाधिकारी कार्यालय - मेहेर सिग्नल या मार्गावर दोन्ही बाजूने सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल. पोलिस, शासकीय सेवेतील अतिमहत्त्वाच्या वाहनांना मनाई आदेश लागू नसतील. पर्यायी मार्ग- मालेगाव स्टॅण्डमार्गे मखमलाबाद नाका, रामवाडी पुलाकडून चोपडा लॉन्समार्गे जुना गंगापूर नाक्यावरून इतरत्र वाहने मार्गस्थ- सारडा सर्कलवरून खडकाळी सिग्नलमार्गे त्र्यंबक नाका सिग्नलवरून जलतरण तलाव सिग्नलमार्गे इतरत्र वाहने मार्गस्थ- मुंबई नाक्यावरून येणारी वाहतूक मायको सर्कलवरून इतरत्र मार्गस्थ