वाघनखांवरुन राजकारण तापलं, वाघनखे कायमस्वरुपी महाराष्ट्रात आणण्यासाठी मुनगंटीवारांचा खास प्लॅन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 2, 2023

वाघनखांवरुन राजकारण तापलं, वाघनखे कायमस्वरुपी महाराष्ट्रात आणण्यासाठी मुनगंटीवारांचा खास प्लॅन

https://ift.tt/yLdRQCF
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाला ज्या वाघनखांचा वापर करून मारले आणि स्वराज्यावरील आदिलशाहीचे संकट परतवून लावले, ती वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 'ही वाघनखे कायमस्वरूपी परत यायला हवीत,' असे शिवसेनेचे नेते यांनी म्हटल्याने राजकीय वातावरण तापले आहे.वाघनखांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली असून, 'या प्रकरणाबाबत मला ज्ञान नाही,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. 'इंग्लंडहून आणण्यात येणारी वाघनखे ही खरी नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवावे,' असे आव्हान भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहे. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार रविवारी रात्री लंडनला रवाना झाले असून, तत्पूर्वी त्यांनी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.उद्या करार:छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट (व्ही अँड ए) संग्रहालयामध्ये आहेत. ती पुन्हा भारतात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि इंग्लंडमध्ये उद्या, मंगळवारी करार होणार असून या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार रविवारी लंडनला रवाना झाले.तीन वर्षांसाठी भारतात:लंडन येथील संग्रहालयात असलेली वाघनखे साधारण तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही वाघनखे कायमस्वरूपी भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यासाठी वाघांची एक जोडी ब्रिटनला देण्याची तयारी आपण दर्शविली असून यात एक नर आणि एक मादी वाघाचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.चार संग्रहालयांत पाहता येणार वाघनखे:छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणल्यानंतर येथील चार वेगवेगळ्या संग्रहालयांत ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नागपूर येथील सेंट्रल म्युझियम, कोल्हापूरमधील द लक्ष्मी विलास पॅलेस आणि मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा समावेश करण्यात आला आहे.११ जणांची समिती:छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी ११ जणांची विशेष समिती नेमण्यात आली आहे. या वाघनखांची सुरक्षा, प्रदर्शन आणि प्रवासाची रूपरेषा ही समिती ठरविणार आहे. यात सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकास खर्गे, पोलिस महासंचालक, मुंबई आणि नागपूरचे पोलिस आयुक्त; तसेच राज्य पुरातत्त्व विभागाचे डॉ. तेजस गर्गे यांचा समावेश करण्यात आला आहे.'वाघनखाबद्धल माहिती नाही':पुणे : लंडनमधील वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणण्याबाबत सध्या वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता, 'मला त्यातले ज्ञान नाही; पण इंद्रजित सावंत म्हणून मराठी भाषा आणि इतिहासाचे जाणकार आहेत. ते सांगू शकतील. प्रत्यक्ष मला काही माहिती नाही,' असे पवार यांनी सांगितले.'बालबुद्धीवर मी काय बोलू?'मुंबई : संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे त्यांच्या वारसाबाबत पुरावे मागितले होते. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, पुरावे मागणे ही त्यांची परंपरा आहे. त्यामुळे मी बालबुद्धीवर काय बोलणार, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर रविवारी घणाघाती टीका केली.शिवेंद्रराजे यांचे आव्हान:सातारा : 'इंग्लंडहून आणण्यात येणारी वाघनखे ही खरी नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवावे,' असे आव्हान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. आदित्य यांच्याकडून वाघनखांबाबत मुद्दाम प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.