मुंबईकरांनो उद्या बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा, मध्य-हार्बरवर देखभाल-दुरुस्ती; पाहा वेळापत्रक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 18, 2023

मुंबईकरांनो उद्या बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा, मध्य-हार्बरवर देखभाल-दुरुस्ती; पाहा वेळापत्रक

https://ift.tt/fP4BnLX
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर शनिवारी सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. यामुळे चर्चगेट ते विरार डहाणू रोडदरम्यान रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.मध्य रेल्वेस्थानक : सीएसएमटी ते विद्याविहारमार्ग : अप आणि डाऊन धीमावेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५परिणाम : धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.हार्बर मार्गस्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेमार्ग : अप आणि डाऊनवेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०परिणाम : सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान अप-डाऊन आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगावदरम्यान अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे. पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.पश्चिम रेल्वेस्थानक : सांताक्रुझ ते गोरेगावमार्ग : पाचवी आणि सहावी मार्गिकावेळ : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.३०परिणाम : शनिवार ते रविवारदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.