तळोजात केमस्पेक केमिकल्सला भीषण आग; मोठं आर्थिक नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 29, 2023

तळोजात केमस्पेक केमिकल्सला भीषण आग; मोठं आर्थिक नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

https://ift.tt/pDJjO4Y
कुणाल लोंढेपनवेल: तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमस्पेक केमिकल्स लि. कंपनीला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ही आग इतकी भीषण होती की काही मीटर अंतरावरून आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पडघे गाव येथील प्लॉट नं. ३ सी या ठिकाणी असलेल्या केमस्पेक केमिकल्स लिमिटेड या रासायनिक कंपनीमध्ये फार्मा आणि कॉस्मेटीक कंपनीसाठी लागणारे केमिकल बनविण्यात येते. या कंपनीमध्ये सायंकाळी उशिरा अचानक आग लागली. या आगीची माहिती मिळताच तळोजा औद्योगिक वसाहतीचे अग्नीशमन दलाचे बंब, कळंबोली, खारघर, पनवेल, सिडको येथील अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.