https://ift.tt/UzAgKms
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्व सामान्य नागिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत ५१ कोटी भारतीयांची खाती उघडण्यात आली होती. यापैकी १० कोटी खाती निष्क्रिय झाली आहेत. म्हणजेच या खात्यांवर कसलाही व्यवहार होत नसल्याची माहिती आहे. या १० कोटी खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा आहे. या खात्यामधील रक्कम घेणारं देखील कोणी नसल्याची माहिती आहे. जनधन योजनेमुळे डीबीटी पद्धतीनं सरकारी योजनांचे लाभ संबधित व्यक्ती पर्यंत पोहोवण्यासाठी फायदा झाला होता. गरीब व्यक्तींना बँकिंग सुविधा उपलबध करून देण्यात या योजनेचा मोठा वाटा होता. ही योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे गरीब लोकांची खाती उघडण्यात आली होती.
१० कोटी जनधन खाती बंद का?
एका रिपोर्टनुसार १० कोटी जन धन खात्यांमध्ये १२७७९ कोटी रुपये शिल्लक आहेत. यापैकी ४.९३ कोटी खाती महिलांची आहेत. रिपोर्ट नुसार देशात ५१.११ कोटी जन धन खाती आहेत.ही खाती बंद होण्यास अनेक कारणं आहेत. याचा खाते धारकांशी कसलाही संबंध नाही. काही महिने या खात्यांवर व्यवहार न झाल्यानं खाती बंद आहेत. आरबीआयच्या निर्देशानुसार एखाद्या खात्यात दोन वर्ष व्यवहार न झाल्यास बचत आणि. चालू खाते निष्क्रिय मानले जाते. बँका या निष्क्रिय खात्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. जन धन खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागत नाही.जर तुमचं जनधन खात बंद झालं असेल तर तुम्हाला बँकेत जावं लागेल. बँकेत एक अर्ज भरून द्यावा लागेल. बँक खात्याची केवायसी प्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर तुमचं खात सक्रीय होईल. Read Latest And