जालना : जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा अखेर मुहूर्त ठरला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ३० डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे रवाना होईल. मुंबई जालना दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही आठ डब्यांची असेल. रावसाहेब दानवे जालना येथे पत्रकारांसोबत बोलत होते. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीचा मुहूर्त ठरला असून ३० डिसेंबर रोजी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेला सुरुवात केली जाणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली आहे. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी धावणार असून ३० डिसेंबर रोजी ११ वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वेला सुरुवात केली जाणार आहे. आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त जालन्यातील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलदगतीने होण्यास मदत होणार असून व्यापारासाठी तसेच मंत्रालय वगैरे अशा कामांसाठी जाणाऱ्यांना फायदेशीर असणार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले. मुंबई-जालनादरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही आठ डब्यांची असेल. देशातील ४४ वी आणि ४६ वी वंदे भारत एक्स्प्रेस मध्य रेल्वेला मिळणार आहे.