एक दोन नाही तर तब्बल १६ षटकार, न्यूझीलंडच्या फिनने केली पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 19, 2024

एक दोन नाही तर तब्बल १६ षटकार, न्यूझीलंडच्या फिनने केली पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई

https://ift.tt/cAPB4wp
दिगंबर शिंगोटे : आमचे गोलंदाज जगात सर्वोत्तम आहेत, असे पाकिस्तानचे खेळाडू अनेकदा सांगत असतात. मात्र, याच पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई न्यूझीलंडच्या फिन अॅलनने केली आहे. त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल सोळा षटकार लगावले आहेत. पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेतील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडने पाकिस्तानचा ४६ धावांनी पराभव केला, तर दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय नोंदवला. पाच सामन्यांच्या मालिकेत आव्हान राखण्यासाठी पाकिस्तानला तिसऱ्या टी-२०मध्ये विजय अनिवार्य होता. अर्थात, ड्युनेडिनची लढत पाकिस्तानसाठी महत्त्वाची होती. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार आणि वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीचा हा निर्णय पाकिस्तानच्या पथ्यावर पडला नाही. सलामीवीर फिन अॅलनने पाकिस्तानच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. त्याने ६२ चेंडूंत १३७ धावांची खेळी केली. त्यात त्याने सोळा षटकार आणि पाच चौकार लगावले. अर्थात, १३७पैकी ११६ धावा त्याने चौकार-षटकारांतूनच वसूल केल्या. यासह त्याने टी-२० सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाची बरोबरीही केली. यापूर्वी, २०१९मध्ये देहरादूनला अफगाणिस्तानच्या हझरतुल्ला झाझइने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात सोळा षटकार लगावले होते. एका डावात एकूण वीस षटकार लगावले गेले. त्यात हारिस रौफच्या गोलंदाजीवर सर्वाधिक सहा षटकार लगावले गेले. त्याच्या चार षटकांत साठ धावांची लूट न्यूझीलंडने केली. याशिवाय शाहिन शाह आफ्रिदी, महंमद नवाझ यांच्या गोलंदाजीवर प्रत्येकी चार, तर झमान खान, महंमद वसिम यांच्या गोलंदाजीवर प्रत्येकी दोन षटकार लगावले गेले. षटकारांच्या पावसामुळे न्यूझीलंडने २२४ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तर देताना पाकिस्तानला १७९ धावाच करता आल्या. - फिनचा तडाखा- फिन अॅलनने १३७ धावांची खेळी केली. ही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील न्यूझीलंडकडून नोंदली गेलेली सर्वोच्च खेळी ठरली. याबाबतीत फिनने ब्रेंडन मॅक्‌‌लमला मागे टाकले. ब्रेंडनने २०१२मध्ये बांगलादेशविरुद्ध १२३ धावांची खेळी केली होती. - फिनने हारिस रौफच्या चौदा चेंडूंत सहा षटकार लगावले. यापूर्वी, एका सामन्यात केवळ तीनच फलंदाजांना एका गोलंदाजाविरुद्ध सहा षटकार लगावता आले आहेत. २००७मध्ये युवराजसिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार लगावले होते; तसेच २०२१मध्ये कायर पोलार्डने अकिला धनंजयच्या गोलंदाजीवर एका टी-२०त सहा, तर २०२३मध्ये जोश इंग्लिसने भारताच्या रवी बिश्णोईच्या गोलंदाजीवर सहा षटकारही लगावले होते.