भाची घरात चहा पीत होती; तेवढ्यातच मामाचे क्रूर कृत्य, अत्याचाराच्या घटनेनं अमरावती हादरलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 26, 2024

भाची घरात चहा पीत होती; तेवढ्यातच मामाचे क्रूर कृत्य, अत्याचाराच्या घटनेनं अमरावती हादरलं

https://ift.tt/6TlOiSY
अमरावती: मामाने आपल्या १४ वर्षीय भाचीचेच लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय तपासणीअंती मंगळवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या शाळेला २२ जानेवारी रोजी सुटी होती. त्यामुळे ती घरीच होती. त्यादिवशी तिच्या गावात भंडारा होता. त्यामुळे ती जेवण करण्यासाठी गेली होती. परत येत असताना रस्त्यात तिला तिची मामी भेटली. त्यामुळे ती मामीसोबत त्यांच्याकडे गेली. तेथे सायंकाळी मामीने तिला आणि तिच्या मामाला चहा दिला. त्यानंतर मामी चहा पिऊन गावात भंडारा बनविण्यासाठी निघून गेली. पीडित मुलगी आणि तिचा मामा हे दोघे चहा पित होते. तेवढ्यात मामाने घराचे दार आणि लाइट बंद केले. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर पीडित मुलगी ही कशीबशी घरी पोहोचली. तिने आपबिती आईकडे कथन केली. दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला वरूड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्यावर कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडित मुलीचे जबाब नोंदविला. त्या आधारावर कोतवाली पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे प्रकरण मध्यप्रदेशातील संबंधित ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.