शरद मोहळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडसह ८ जण ताब्यात, आरोपींनी कारणही सांगितलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 6, 2024

शरद मोहळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडसह ८ जण ताब्यात, आरोपींनी कारणही सांगितलं

https://ift.tt/QmeG7as
पुणे: कुख्यात गुंड शरद मोहळ याची आज दुपारी १.३० च्या सुमारास पुण्यातील कोथरूड येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे. शरद मोहळ याची कुख्यात गुंड पासून हिंदुत्ववादी संघटनेककडे वाटचाल सुरू होती. शरद मोहळ हे नाव पूर्ण पुणे शहरात प्रसिद्ध होत चाललेलं. मात्र त्याचा आज दिवसाढवळ्या खून झाला. याप्रकरणी आतापर्यंत एक नाव साहिल उर्फ मुना संतोष पोळेकर याच्यावर आधी पोलिसांना संशय होता. मात्र त्याचा माग घेत असताना मोठी नाव समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी शरद मोहळ खून प्रकरणाचा तपास करत असताना आठ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये संतोष पोळेकर आणि त्याचे साथीदार आणि मास्टरमाईंड नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामा याला देखील अटक करण्यात आली आहे. ही हत्या शरद मोहळसोबत असलेल्या पैशाच्या आणि जमिनीच्या वादातून झाली आहे. आज दुपारपासून पुणे शहर गुन्हे शाखेची ९ तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. त्यादरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी - शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून ८ आरोपी, ३ पिस्टल, ३ मॅगझीन, ५ राउंड आणि २ चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.