अजितदादा आणि तावरे १५ वर्षानंतर एकत्र आले पण चंद्रराव बोललेच नाहीत! - Times of Maharashtra

Monday, April 29, 2024

demo-image

अजितदादा आणि तावरे १५ वर्षानंतर एकत्र आले पण चंद्रराव बोललेच नाहीत!

https://ift.tt/pUKlGwi
nbt-video
दीपक पडकर, बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील सांगवीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. यामध्ये व्यासपीठावर माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे दोघेही उपस्थित होते. अर्थात पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच सांगवीमध्ये हे तीन नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सांगवी हा तावरेंचा तसा बालेकिल्ला, पण आज अजित पवारांनी सभा गाजवली. या सभेमध्ये अजित पवारांनी गेल्यास पन्नास वर्षाचा सगळा इतिहासच मांडला. पवार कुटुंबातील अनेक मुद्द्यांवर पोलखोल या सभेमध्ये अजित पवारांनी केली. यामध्ये अगदी पुलोदच्या सरकारपासून ते आत्ताच्या शपथविधीपर्यंत अनेक मुद्दे अजित पवारांनी घेतले. यामध्ये अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करताना मला प्रत्येक वेळी व्हिलन केले अशाच स्वरूपाचा अप्रत्यक्ष आरोप केला.अर्थात या सभेमध्ये चंद्रराव तावरे मात्र बोलले नाहीत. चंद्रराव तावरे बोलले नाहीत, याची बातमी होऊ शकते हे लक्षात घेत अजित पवारांनी मिश्किलपणे सांगितले की, उद्या लगेचच ब्रेकिंग न्यूज होईल चंद्रराव अण्णांना सभेत बोलू दिले नाही. परंतु अण्णांना उन्हाचा त्रास झाला असल्यामुळे अण्णांनीच तशा संदर्भातील सूचना केली होती. त्यामुळे मी बोलायला उठलो, असे अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. एकंदरीत आज सांगवीमध्ये अजित पवारांनी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या समवेत सभा घेऊन नंतर चंद्रराव तावरे यांच्या घरी भेट देऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. काही दिवसांपूर्वीच खुद्द शरद पवार हे चंद्रराव तावरे यांच्या घरी स्वतःहून आले होते. त्यांनी चंद्रराव तावरे यांच्याशी बंद दाराआड पंधरा मिनिटे चर्चा देखील केली. त्यावरून राजकीय गदारोळ उठला असतानाच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच आज अजित पवार हे चंद्रराव तावरे यांच्या घरी गेले होते.

Pages