गाडी तुझा भाऊ चालवणार! कोट्यवधीची कार सोडून रोहित शर्मा झाला बस ड्रायव्हर; स्टेअरिंग हातात घेतल्यावर पाहा काय केलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 14, 2024

गाडी तुझा भाऊ चालवणार! कोट्यवधीची कार सोडून रोहित शर्मा झाला बस ड्रायव्हर; स्टेअरिंग हातात घेतल्यावर पाहा काय केलं

https://ift.tt/a74VgFu
मुंबई: आयपीएल २०२४मध्ये संघाची गाडी विजयाच्या मार्गाला लागली आहे. पहिल्या ३ लढतीत पराभव झाल्यानंतर मुंबईने गेल्या २ लढतीत शानदार विजय मिळवले. गुणतक्त्यात मुंबईचा संघ ४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. उद्या (१४ मार्च) रविवारी मुंबईची लढत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होत आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईतील या लढतीला एन क्लासिनो या नावाने देखील ओळखले जाते. चेन्नईविरुद्धच्या लढती आधी मुंबईचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. आयपीएलमधील या मोठ्या लढतीच्या आधी जेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ हॉटलवर पोहोचला तर रोहित शर्माने बसचे स्टेअरिंग हातात घेतले. संघातील खेळाडू बसमधून खाली उतरले तेव्हा रोहित बस चालकाच्या सीटवर जाऊन बसला आणि त्याने स्टेअरिंग हातात घेतले. रोहित शर्माचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला. रोहित जेव्हा चालकाच्या सीटवर बसला तेव्हा बसच्या समोर उपस्थित असेलल्या चाहत्यांनी हा क्षण टिपण्याची संधी सोडली नाही. तर बस चालकाच्या भूमिकेत गेलेल्या रोहितने स्वत:च्या कॅमेऱ्यात चाहत्यांचे फोटो काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळून देणाऱ्या रोहितला या वर्षी कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. मुंबईचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे दिले असले तरी मॅच सुरू असताना चाहत्यांचा पाठिंबा रोहित असल्याचे पहायला मिळाले आहे. आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यात रोहितने ९३ चेंडूत १५६ धावा केल्या आहेत. ४९ ही त्याची सर्वोत्तम खेळी असून त्याची सरासरी ३१.२० इतकी आहे. तर त्याचा स्ट्राइक रेट १६७.७४ इतका आहे. रोहितच्या बॅटमधून १७ चौकार आणि १० षटकार आले आहेत. मुंबईचा आयपीएल २०२४मधील आतापर्यंतचा प्रवास गुजरात टायटन्स विरुद्ध ६ धावांनी पराभव सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ३१ धावांनी पराभव राजस्थान रॉयल्स विरुद्ध ६ विकेटनी पराभव दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध २९ धावांनी विजय राजस्थान रॉयल्स विरुद्ध ७ विकेटनी विजय