-
क्रिकेटप्रेमींना लवकरच चालू होणाऱ्या आशिया चषक 2025 ची ओढ लागली आहे. याच स्पर्धेत येत्या 9 सप्टेंबर यूएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.
-
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या देशांच्या टीमदेखील सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आले असून भारत आपला पाहिला सामना 10 सप्टेंबर रोजी खेळणार आहे.
-
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची संपूर्ण जगात चर्चा असते. कारण हा सामना पाहण्यासाठी मैदान गच्च भरलेलं असतं. कोट्यवधील लोक हा सामना पाहात असतात. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अकरम यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना कोण जिंकणार? याबाबतचं भाकित केलं आहे.
-
या सामन्याविषयी बोलताना, मला विश्वास आहे की आशिया चषकातील भारत-पाकिस्तानचा सामना हा चांगलाच रोमहर्षक होईल. या सामन्यादरम्यान खेळाडू तसेच दर्शक शिस्तीचे पालन करतील अशी अपेक्षा आहे.
-
भारतीय नागरिकांना आपला संघ जिंकावा असे वाटते. तर पाकिस्तानलादेखील आमचाच विजय व्हावा असे वाटते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टेस्ट सिरीज पुन्हा एकदा चालू व्हायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे, असेही अकरम म्हणाले.
-
कोणता संघ हा सामना जिंकणार, याबाबतचं भाकित वर्तवताना अकरम म्हणाले की सध्या भारत चांगला फॉर्ममध्ये आहे. भारत या चषकात विजयाचा दावेदार म्हणून उतरणार आहे. मात्र त्या दिवशी जो संघ दबावाला चांगल्या पद्धतीने हाताळू शकेल तोच संघ जिंकेल, असं त्यांनी सांगितलं.