
बिग बॉस 19 मध्ये दिसणारी तान्या मित्तल सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे. तिने घरात स्वत:च्या लाईफस्टाईलविषयी, तिच्या श्रीमंतीबद्दल,व्यवसायाबद्दल जे काही सांगितलं त्यावर बिग बॉसच्या घरातील सदस्य तसेच प्रेक्षकांनाही विश्वास बसत नाहीये. अनेकांनी सोशल मीडियावर तान्यावर टीकाही केली आहे.
तान्याच्या एक्स बॉयफ्रेंडचा धक्कादायक दावा
काही लोकांना तान्या आवडत आहे. त्याच वेळी, काही लोक तान्या मित्तलला ट्रोल करत आहेत. आता तान्या मित्तलचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचा दावा करणाऱ्या बलराज सिंहने देखील तान्या मित्तलबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की तान्या मित्तलने घरात जाण्यापूर्वी त्याला देखील मेसेज केला होता. तिने बलराजला विचारले होते की ती त्याचे नाव मित्रांच्या यादीत लिहू शकते का?
घरात प्रवेश करण्यापूर्वी तान्याने त्याला काय मेसेज केला होता?
एका मुलाखतीत त्याने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे. बातचीत करताना बलराज सिंह म्हणाला की, घरात प्रवेश करण्यापूर्वी तान्याने त्याला मेसेज केला होता. बलराजने त्याच्या आणि तान्यामध्ये झालेले चॅट देखील कॅमेऱ्यातही दाखवले. एवढंच नाही तर तान्याने बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी बलराजने त्याच्या लाईव्हमध्ये मृदुलबद्दलही सांगितले होते. त्या त्या चॅटमध्ये तान्या बलराजला विचारत होती की मृदुल कोण आहे?
बलराज आणि तान्याची चॅट
एवढंच नाही तर या चॅटमध्ये बलराज वृंदावनचा देखील उल्लेख करताना दिसत आहेत. बलराज आणि तान्या यांच्या चॅटमध्ये ते वृंदावनमध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल बोलत आहेत. बलराज तान्याला तिचा अहंकार कमी करण्यास सांगताना दिसला. तर, तान्या त्याला सांगते की तिला कोणताही अहंकार नाही.
बलराजने कॅमेरॅत दाखवले की तान्याने 20 ऑगस्ट रोजी त्याला मेसेज केला होता आणि विचारले होते की तो बिग बॉसच्या घरात तिचा मित्र म्हणून येईल का? यावर बलराजने तिला विचारले होते की ती त्याला कोणत्या आधिकाराने त्याला बोलवत आहे. बलराजने तान्याला म्हटले होते की जर तिने सॉरी म्हटले तरच ते शक्य आहे. तान्याने बलराजला रिप्लायही केला होता की “सॉरी बलराज, कदाचित मी चूक केली असेल. माझ्या आयुष्यात बरेच लोक राहिले नाहीत. म्हणून कदाचित एकत्र राहण्याचा अर्थ काय हे मला माहित नसेल.” त्याच चॅटमध्ये बलराजने तान्याला हे देखील सांगितले होते की बकलावा तुझ्यासाठी समस्या बनेल.
View this post on Instagram
प्रेमात धोका
बिग बॉसच्या घरात, तान्या म्हणते दिसली आहे की तिची प्रेमात दोनदा फसवणूक झाली आहे. तिच दोन बॉयफ्रेंड होते पण दोन्ही वेळा प्रेमात तिची फसवणूक झाली. आता बलराज सिंगने असाही दावा केला आहे की तान्या काही काळापूर्वी त्याला डेट करत होती. पण ती खूप बनावट आहे. म्हणूनच त्यांचे नातेही टिकू शकले नाही. तसेच तो हेही म्हणताना दिसत आहे की बिग बॉसमध्ये ती जे काही बोलत आहे ते सर्व खोटे आहे असेही त्याने म्हटले.
कोण आहे बलराज सिंग कोण आहे ?
बलराज सिंग हा एक युट्यूबर आणि एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. युट्यूबसह इंस्टाग्रामवरही त्याचे चाहते खूप आहेत. बलराज सेलिब्रिटींचे पॉडकास्ट करतो आणि आध्यात्मिक कथा देखील शेअर करतो.
त्यामुळे आता त्याने तान्याबाबत केलेले दावे कितपत खरे आहे ते पुढे स्पष्ट होईलच पण सध्या तरी बिग बॉसच्या स्पर्धकांपासून ते बाहेरील प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच तान्या जे काही सांगत आहे ते सर्व फसवं वाटतं आहेय