“ट्रम्पचे मोदींशी असलेले मैत्रीचे नाते अखेर संपले, भारत-अमेरिका संबंध…”; कोणी केलं एवढं मोठं विधान? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 6, 2025

“ट्रम्पचे मोदींशी असलेले मैत्रीचे नाते अखेर संपले, भारत-अमेरिका संबंध…”; कोणी केलं एवढं मोठं विधान?

“ट्रम्पचे मोदींशी असलेले मैत्रीचे नाते अखेर संपले, भारत-अमेरिका संबंध…”; कोणी केलं एवढं मोठं विधान?

सध्या अमेरिका आणि भारतात सुरु असलेले वाद, तणाव सर्वांनाच माहित आहे. तसेच सर्वांना हे देखील माहित आहे की भारत-अमेरिकेचे संबंध या वादाच्या आधी किती चांगले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री किती घट्ट होती ते. पण आता चित्र पूर्णपणे वेगळं आहे. याचदरम्यान ट्रम्पचे मोदींशी असलेल्या मैत्रीबद्दल एका व्यक्तीनं फार मोठं विधान केलं आहे आणि ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन.

‘भारत-अमेरिका संबंध सर्वात खालच्या पातळीवर’

बोल्टन यांनी म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी खूप चांगले वैयक्तिक संबंध होते परंतु “ते आता संपले आहे”. त्यांनी इशारा दिला की अमेरिकन नेत्याशी जवळचे संबंध जागतिक नेत्यांना “सर्वात वाईट” काळापासून वाचवू शकणार नाहीत. ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळे आणि त्यांच्या प्रशासनाकडून भारतावर सतत टीका झाल्यामुळे तणाव वाढला आहे. गेल्या दोन दशकांमधील भारत-अमेरिका संबंध सर्वात खालच्या पातळीवर गेल्याचं बोल्टन यांनी म्हटलं आहे.

बोल्टन हे ट्रम्प यांचे कट्टर टीकाकार

जॉन बोल्टन यांनी अलिकडेच ब्रिटीश मीडिया पोर्टल ‘एलबीसी’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “मला वाटते की ट्रम्प आंतरराष्ट्रीय संबंधांकडे नेत्यांशी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक संबंधांच्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यामुळे जर त्यांचे रुसचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी चांगले संबंध असतील तर अमेरिकेचे रशियाशीही चांगले संबंध असतीलच. पण असं नाहीये,” असा खुलासा बोल्टन यांनी केला आहे. दरम्यान जॉन बोल्टन हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. पण आता ते ट्रम्प यांचे जोरदार टीकाकार आहेत.

John Bolton

ट्रम्प यांचे मोदींशी खूप चांगले वैयक्तिक संबंध होते पण….

बोल्टन पुढे म्हणाले “ट्रम्प यांचे मोदींशी खूप चांगले वैयक्तिक संबंध होते. मला वाटते की ते नाते आता संपले आहे आणि हा प्रत्येकासाठी एक धडा आहे. उदाहरणार्थ, ब्रिटेनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्यासाठी, चांगले वैयक्तिक संबंध कधीकधी उपयुक्त ठरू शकतात, परंतु ते तुम्हाला सर्वात वाईट काळापासून वाचवू शकणार नाहीत,” असंही बोल्टन यांनी म्हटलं आहे.

‘व्हाईट हाऊसने अमेरिका-भारत संबंधाला दशके मागे ढकलले’

एका मुलाखतीत तसेच त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये देखील बोल्टन यांनी म्हटलं आहे की व्हाईट हाऊसने “अमेरिका-भारत संबंधला अनेक दशकं मागे ढकललं आहे, ज्यामुळे मोदी रशिया आणि चीनच्या जवळ आले आहेत. चीनने स्वतःला अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पर्याय म्हणून सादर केले आहे.”

या सर्व परिस्थितीवरून बोल्टन यांनी सध्याची भारत अमेरिकेमध्ये असलेली तणापूर्ण परिस्थिती तसेच मोदी आणि ट्रम्प यांच्यातील मैत्रीची परिस्थिती काय आहे यावर प्रकाश टाकला आहे.