
डोनाल्ड ट्रम्प हे एका मागून एक मोठे धक्के भारताला देत आहेत. सुरूवातीला भारतावर त्यांनी तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. टॅरिफमधून भारत मार्ग काढतच असताना त्यांनी भारतीयांना मोठा दणका देत थेट H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाला भरमसाठ फीस लावलीये. काही लोक अमेरिकेत इतका जास्त पैसा देखील कमवत नाहीत, जितका त्यांना व्हिसाची फिस म्हणून द्यायचा आहे. अमेरिकेत राहणारे भारतीय लोक संकटात सापडली आहेत. हेच नाही तर अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना या नियमाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत परत लवकर या आणि शक्यतो अमेरिका न सोडण्याचे निर्देश दिली आहेत. H-1B व्हिसाची फीस आता 100,000 डॉलर्स अर्थात 88 लाख रूपये निश्चित करण्यात आलीये.
व्हिसाच्या नियमातील बदलानंतर लोकांमध्ये मोठा संभ्रम बघायला मिळाला. हेच नाही तर भारतात असलेले H-1B व्हिसा धारक आहेत, त्या स्थितीमध्ये थेट अमेरिकेकडे रवाना झाल्याने कारण तशा सूचनाच कंपन्यांनी दिल्या होत्या. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, “हे एकवेळचे शुल्क आहे, वार्षिक शुल्क नाही आणि ते फक्त नवीन लोक H-1B व्हिसासाठी अर्ज करत आहेत, त्यांच्यासाठीच आहे फक्त.
ज्यावेळी 88 लाख रूपये H-1B व्हिसासाठी भरावे लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले, त्यावेळी लोकांमध्ये भितीचे वातावरण बघायला मिळाले. हेच नाही तर सुरूवातीला असेही सांगितले गेले की, 88 लाख प्रत्येक वर्षी भरावे लागतील. आता कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, हे शुल्क व्हिसा लागल्यानंतर एकदाच भरावे लागेल, दरवर्षी नाही. शिवाय ज्या लोकांकडे अगोदरच H-1B व्हिसा आहे, त्यांना देखील हे शुल्क भरण्याची गरज नाही.
H-1B व्हिसा ज्यांच्याकडे आता त्यांच्या नियमात कोणताही बदल करण्यात आला नाही. हा नियम नवीन H-1B व्हिसा धारकांसाठी आहे. मात्र, अमेरिकेने पुन्हा एकदा H-1B व्हिसाच्या माध्यमातून भारताला अत्यंत मोठा धक्का दिला आहे. H-1B व्हिसा हा अमेरिकेत नोकरी करण्यासाठी लागतो. मात्र, अमेरिकेत नोकरी शोधण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीला हा व्हिसा मिळवण्यासाठी 88 लाख रूपये भरणे देखील शक्य नसते.