-
पितरांचा दोष असेल तर कामाच बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे पितृपक्षात पितरांची शांती करण्याची संधी असते. या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्यास त्याचा फळ मिळते, असं शास्त्र सांगतं. पण हे कार्य घरातील पुरुषाच्या हातून केली जातात. पण ज्या घरात पुरुष नसेल तर ती व्यक्ती करू शकते का? चला जाणून घेऊयात
-
पुरुषच हे विधी करू शकतो अशी धारणा समाजात आहे. पण तसं अजिबात नाही. गरूड पुराणानुसार, महिला देखील श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करू शकतात. गरुड पुराणात याबाबत काही संदर्भ सांगितले गेले आहेत. ते नियम पाळल्यास महिला आणि मुलीही हे विधी करू शकतात.
-
धार्मिक मान्यतेनुसार, महिलाही पितरांना जल देऊ शकतात. श्राद्ध किंवा तर्पण करू शकतात. जर घरात पुरुष व्यक्ती नसेल तर किंवा कुटुंबात कोणी पुरूष सदस्य नसेल तर करू शकतात.
-
गरूड पुराण आणि वाल्मिकी रामायणमध्येही याबाबत स्पष्ट केलं आहे. सीतामातेने स्वत: राजा दशरथाचं पिंडदान केलं होतं. यामुळे महिलाही पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किंवा त्यांना मुक्ती देण्यासाठी हे विधी करू शकतात.
-
घरात श्राद्ध किंवा तर्पण करण्याासठी पुरुष व्यक्ती नसेल तर महिला घरी हे विधी करू शकते. गरुड पुराणानुसार पूत्र नसल्यास कन्या देखील वडिलांचं श्राद्ध तर्पण करू शकते.
-
जेव्हा घरात मुलगा नसतो आणि तर्पण केले जात नाही तेव्हा पितरं नाराज होतात. तसेच कामात अनेक अडथळे येतात. अशा परिस्थितीत महिला तर्पण करून पूर्वजांना प्रसन्न करू शकतात. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)





