कुणीही कुणासोबत जाऊ शकतं… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत CM फडणवीस असं का म्हणाले? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 14, 2025

कुणीही कुणासोबत जाऊ शकतं… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत CM फडणवीस असं का म्हणाले?

कुणीही कुणासोबत जाऊ शकतं… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत CM फडणवीस असं का म्हणाले?

भाजपसह राज्यातील सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरा करून निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आज फडणवीस यांनी विविध ठिकाणी जात तयारीही माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आगामी निवडणूकीतील युतीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. कुणीही कुणासोबत जाऊ शकतं असं फडणवीस म्हणाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जिथे शक्य तिथे महायुती म्हणून लढणार – देवेंद्र फडणवीस

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जिथे शक्य तिथे महायुती म्हणून लढणार, युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. स्थानिक नेतृत्वाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. युती झाली नाही तर मित्र पक्षांवर टीका केला जाणार आहे. मैत्रीपूर्ण लढत होणार, युती झाली नाही तर मित्र पक्षांवर टीका केला जाणार आहे, कार्यकर्त्यांनी हे मान्य केले आहे.

कुणीही कुणासोबत जाऊ शकतं… – देवेंद्र फडणवीस

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘कोण कुणासोबत जाईल हे सांगता येत नाही, काहीही झालं तरी भाजप आणि महायुतीचीच सत्ता येणार आहे. जनता आम्हाला निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे. कारण आगामी निवडणुकींबाबत पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये उत्साह आहे.’

कोणतीही योजना बंद होणार नाही – देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काही योजना बंद करण्यात आल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अंबादासजींना शिंदे साहेबांबद्दल चांगलं ट्वीट करण्याची इच्छा झाली हे महत्त्वाचं आहे. आम्ही कोणतीही योजना बंद करणार नाही. सरकार सगळ्या योजना चालवणार आहोत. एखाद्या योजनेला थोडाफार फटका बसू शकतो, मात्र कोणतीही योजना बंद होणार नाही.