-
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एका आय-20 कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
-
या घटनेत काही लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, आता हा स्फोट ज्या कारमध्ये झाला, त्या कारची माहिती समोर आली आहे. या कारच्या मालकाबाबतही माहिती मिळाली आहे.
-
या कारचा मालक हा मुळचा हरियाणा येथील आहे. सिग्नलवर थांबल्यानंतर या कारचा स्फोट झाला होता. पोलिसांनी तसेच तपास संस्थांनी आय- 20 कारची तपासणी केली आहे. या कारमधील पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
-
मिळालेल्या माहितीनुसार या कारची पासिंग हरियाणातील गुरुग्राम येथील असून कारचा मालक ही नदीम खान नावाची व्यक्ती आहे. त्यामुळे आता पोलिसांना तपासाची दिशा मिळाली असून लवकरच हा स्फोट होता दहशतवादी गट याची माहिती मिळणार आहे.
-
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. संपूर्ण दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या स्फोटाचे कारण नेमके काय आहे? हे लवकरच समजेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




