SRH vs RR Live Streaming : हैदराबादसमोर राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना जिंकण्यापासून रोखणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 13, 2026

SRH vs RR Live Streaming : हैदराबादसमोर राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना जिंकण्यापासून रोखणार?

SRH vs RR Live Streaming : हैदराबादसमोर राजस्थानचं आव्हान, सलग पाचवा सामना जिंकण्यापासून रोखणार?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सोमवारी 13 एप्रिलला 2 चॅम्पिन्स संघ आमनेसामने असणार आहेत. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. हैदराबादसमोर राजस्थानचा विजयरथ रोखून विजयी ट्रॅकवर परतण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. दोन्ही संघांचा हा या 19 व्या मोसमातील पाचवा सामना असणार आहे. राजस्थानने रियान पराग याच्या नेतृत्वात एकूण आणि सलग 4 सामने जिंकले आहेत. तर इशान किशन त्याच्या नेतृत्वात हैदराबादला 4 पैकी फक्त एकाच सामन्यात विजयी करण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता हैदराबाद कमबॅक करत सामना जिंकणार की राजस्थान सलग पाचवा विजय मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.