लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांवर संकट, पुढील काही तास धोक्याची, राज्यावर.. - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 18, 2026

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांवर संकट, पुढील काही तास धोक्याची, राज्यावर..

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांवर संकट, पुढील काही तास धोक्याची, राज्यावर..

राज्यात उष्णतेचा कहर बघायला मिळत आहे. यासोबतच काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा इशाराही देण्यात आला. विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. धाराशिव आणि लातूरमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. आज हिंगोली, परभणी, अमरावती, वर्धा, अकोला, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा मोठा इशारा देण्यात आला. बाकी राज्यातील इतर भागांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. रविवारी अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ, ब्रह्यपुरी या ठिकाणी 45 अंश सेल्सिअच्या पुढे तापमानाची नोंद झाली. जवळपास जिल्ह्यांमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही दिवसातच राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा जवळपास वर्षभर पाऊस पडल्यासारखा पडला. पाऊस काही विश्रांती घेताना दिसला नाही.

राज्यात सध्या सूर्य आग ओकताना दिसत आहे. उष्णता वाढत आहे. आज राज्यावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळतंय. उष्णतेसोबतच थेट पावसाचाही इशारा देण्यात आला. गोंदिया जिल्ह्यात सतत हवामान बदलताना दिसत आहे.  कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्हाचे चटके, अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जिल्ह्याचे तापमान तब्बल 42.2 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे.

तापमानात सतत चढ-उतार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. अकोल्यातील उष्णतेचा कहर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. आज अकोल्यात उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे. प्रशासनाकडून उष्णतेपासून संरक्षण करण्याकरिता नक्की काय उपायोजना करायच्या, या सूचना देण्यात आल्यात.

गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाला बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारपीट झाल्याने शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले. काही ठिकाणी कापणीसाठी आलेले धान पावसामुळे आडवे पडले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.