वनप्लसचा 7T स्मार्टफोन, टीव्ही भारतात लाँच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 26, 2019

वनप्लसचा 7T स्मार्टफोन, टीव्ही भारतात लाँच

https://ift.tt/2nA5WW9
नवी दिल्लीः चीनची कंपनी वनप्लस (OnePlus) ने वनप्लस ७ टी हा स्मार्टफोन () आणि वनप्लस टीव्ही () आज लाँच केले आहेत. वनप्लस ७टी या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर टीव्हीची किंमत ६९ हजार ९९० रुपये इतकी आहे. वनप्लस ७टीमध्ये दोन पर्याय देण्यात आले आहेत. ८ जीबी रॅम १२८ स्टोरेजच्या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम २५६ स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. वनप्लसच्या Q1 या टीव्हीची किंमत ६९ हजार ९०० रुपये तर Q1 Pro ची किंमत ९९ हजार ९०० रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा १२ आणि १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून या फोनमध्ये ३,८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याआधी कंपनीने वनप्लस ७ व ७ प्रो भारतात लाँच केला होता. कंपनीने लाँच केलेल्या वनप्लस ७ टीमध्ये दमदार प्रोसेसर, कॅमेरा आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. OnePlus 7Tची वैशिष्ट्ये >> ६.५५ फुल एचडी प्लस फ्लूयड एलईडी >> ट्रिपल कॅमेरा >> ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा >> १६ मेगापिक्सल अल्ट्रवाइड >>१२ मेगापिक्सल टेलेफोटो >> सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा >> क्वालक्वाम स्नॅपड्रॅगन ८५५ >> ३८०० एमएएच क्षमतेची बॅटरी